Crime News saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: नात्याला काळीमा! काका आणि भावासह तिघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वेगवेगळ्या बहाण्याने तिघांनी वेगवेगळ्या वेळी प्रवेश करून निरागस मुलीवर शारीरिक अत्याचार केले.

साम टिव्ही ब्युरो

>> जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे संतापजनक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काका, मावस भाऊ व अन्य एकाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर येथून जवळच असलेल्या शेळद येथे ही घटना घडली आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. हीच संधी पाहून तिचा काका रोशन भाऊसाहेब गवई, मावस भाऊ शुद्धोधन गोवर्धन अंभोरे तसेच गावातील ज्ञानेश्वर उर्फ लाल्या बंडू शेळके यांनी मुलीवर अत्याचार केले.

या तिघांनी मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला. अल्पवयीन मुलीचे घरात कुणीही नसल्याचे पाहून वेगवेगळ्या बहाण्याने तिघांनी वेगवेगळ्या वेळी प्रवेश करून निरागस मुलीवर शारीरिक अत्याचार केले.

सदर घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादनुसार बाळापूर पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ३७६ (अ) (ए) ३७८ (३) ३५४, ३५४ (ए) ५०६, ३४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अधिनियम सहकलम ३, ४, ५, ६, ७, ८, पोटकलम ३ (२) अन्वये तिघांविरूध्द गुन्हा नोंदवून वरील तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT