Virar Arnala Beach News Saam TV
महाराष्ट्र

Arnala Beach : अर्नाळा समुद्रात अल्पवयीन जोडप्याने मारली उडी; धक्कादायक घटनेनं विरारमध्ये खळबळ

Virar Arnala Beach News : अर्नाळा समु्द्रात अल्पवयीन जोडप्याने उडी मारून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली.

Satish Daud

अर्नाळा समु्द्रात अल्पवयीन जोडप्याने उडी मारून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. एका स्थानिक व्यक्तीने मुलीला वाचवण्यात यश मिळवले. मात्र, अल्पवयीन मुलगा बुडाला असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात उडी घेणारे मुलगा आणि मुलगी दोन्ही १७ वर्षीय आहेत. ते विरार पश्चिमेतील (Virar West) रहिवासी असल्याचं कळतंय. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघेही तीन दिवसांपूर्वी घर सोडून पळून गेले होते.

कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Police) या जोडप्याला शोधून काढले. त्यांचा जबाब नोंदवून पालकाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, शनिवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक हे जोडपे कुटुंबियांची नजर चुकवून समुद्रकिनारी गेले. तेथे दोघांनीही एकमेकांचे हात हातात धरून समुद्रात उडी मारली.

दरम्यान, स्थानिकांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ समुद्रात उड्या घेतल्या. यावेळी अल्पवयीन मुलीला वाचवण्यात यश आले. मात्र, खोल पाण्यात गेल्याने मुलगा बुडाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अल्पवयीन मुलाचा शोध घेणे सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरच्या एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

SCROLL FOR NEXT