Shankarrao Gadakh Saam Tv
महाराष्ट्र

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. राहुल राजळे असे त्यांचे नाव आहे. राहुल राजळे हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगरमधील घोडेगाव जवळ ही घटना घडली आहे. मंत्र्यांच्या पीएवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान हा हल्ला का करण्यात आला त्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काल रात्री अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगावमध्ये अज्ञाताकडून राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या राजळे यांच्यावर अहमदनगरच्या मॅक्सकेअर रूग्णालयात राहुल राजळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पाच जणांच्या टोळक्याने हा हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT