Crime News Saam Tv
महाराष्ट्र

मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकावरील गोळीबाराचे धक्कादायक कारण समोर; ३ संशयितांना अटक

हल्ले खोरांनी त्यांच्यावर तीन फायर केले त्यापैकी एक गोळी त्यांना कमरेच्या खालील भागास लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.

सचिन अगरवाल

अहमदनगर: राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जीवघेणा हल्ला केला. तीन ते चार अज्ञातांनी गोळीबार केलाची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या 3 जणांना ताब्यात घेतले असून पोलिस तपास करत असल्याचं पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.

जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) एका यात्रेतून आपल्या घरी जात असतानी आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. हल्ले खोरांनी त्यांच्यावर तीन फायर केले त्यापैकी एक गोळी त्यांना कमरेच्या खालील भागास लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी राहुल राजळे त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली आहे. प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे कामात अडथळा काढतो म्हणत त्यांनी गोळीबार केल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे मॅक्स केअर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुल राजळे यांच्या वरील गोळीबारानंतर नेवाश्या सह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच आणखीन आरोपी निष्पन्न होणार असून नेमका हा हल्ला का झाला आणि कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई हादरली! मध्यरात्री रिसॉर्टमध्ये गोळीबार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

Reheated rice: कालचा भात गरम करून खाण्यापूर्वी हे नक्की वाचा; एका चुकीमुळे होईल फूड पॉइझनिंग!

Kuchu Puchu Meaning : कुचू-पुचू म्हणजे नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या Gen Z स्लँग्सचा मजेशीर अर्थ जाणून घ्या

Ratnadurg Fort : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यात दडली आहेत अनेक रहस्ये, एकदा जाणून घ्याच

SCROLL FOR NEXT