chandrakant patil and supriya sule  saam tv
महाराष्ट्र

'सुप्रिया ताई, तुम्ही काळजी करु नका, मुख्यमंत्री...'; चंद्रकांत पाटील यांचा जोरदार टोला

खासदार सुळे यांच्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रदीप भणगे

Chandrakant Patil News : गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक मंडळातील गणेश मूर्तींचे दर्शन घेतले. गणेशोत्सवातील दहा-अकरा दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनासाठी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या गणेश मंडळांच्या भेटीवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'राज्याला दोन मुख्यमंत्री पाहिजेत', अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. खासदार सुळे यांच्या टीकेला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने परिसरातील किर्तनकारांचा जाहीर सत्कार सोहळा या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

'अतिशय व्यवस्थित प्रशासन सुरू आहे. तुम्ही तर घराच्या बाहेरच पडत नव्हत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याला दोन-दोन मुख्यमंत्री पाहिजेत. एक प्रशासनाला आणि एक फिरायला. सुप्रिया ताई, तुम्ही काळजी करू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सरकार पण चालवतील आणि फिरतीलही, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कौशल्य विकास विषयक शिक्षणावरही भाष्य केलं. 'शिक्षणासोबत कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. इतकेच नाही तर बीए, बीएस्सी करून चालणार नाही. हे सामान्य ज्ञान आहे. बीएस्सीसोबत कौशल्य विकास केले पाहिजे. ज्यामुळे ज्ञान आणि कौशल्य वाढणार आहे. त्याचा फायदा तरुणांना रोजगारासाठी होणार आहे, याकडे मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT