Atul Save Saamn TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा बांधवांकडून मंत्री अतुल सावे यांना घेराव, नागरिकांचा संताप पाहून दुचाकीवरून ठोकावी लागली धुम

BJP leader Atul Save Latest News : संभाजीनगरचे पालकमंत्री अतुल सावे यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

प्रविण वाकचौरे

Chattrapati Sambhajinagar :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मराठा समाजाने राजकीय नेत्यांना ठिकठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. या प्रवेशबंदीचा फटका आता बड्या नेत्यांनाही बसत आहेत. मंत्री अतुल सावे यांना देखील मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानीनगर परिसरात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उदघाट्न कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने त्यांना घेरावा घातला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांना जाब विचारण्यात आला. (Latest News)

यावेळी कार्यकर्त्यांनी ४० दिवस सरकारने काय केल? असा सवाल करत त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत त्यांना अडवण्यात आलं. यावेळी आक्रमक मराठा समाजाचा रोष पाहून पालकमंत्री अतुल सावे यांना एका दुचाकीवरून धुम ठोकण्याची वेळ त्यांच्यावर आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आक्रमक मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी अतुल सावे आणि सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाची मागणी करत सरकारचा जाहीर निषेधही यावेळी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT