मिनी मंत्रालय पोटनिवडणुक; शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी जयेश गवांडे
महाराष्ट्र

मिनी मंत्रालय पोटनिवडणुक; शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी इच्छुकांची गर्दी

अकोला जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या 42 जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.

जयेश गावंडे

अकोला - जिल्हा परिषदेसह पंचायत समितींच्या 42 जागा मार्च महिन्यात रिक्त झाल्या आहेत. सदर जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोट-निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 19 जुलै रोजी मतदान तर 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, तर इच्छुक उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी मोठी गर्दी केली होती.

यावेळी उमेदवार आणि समर्थकांची शासकीय कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळली. जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी दरम्यान सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झालीय. तर काँग्रेस, भाजप आणि वंचीत बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार आहे.

हे देखील पाहा -

जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. दरम्यान आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी उमेद्वारांनी प्रचाराला सुरूवात केलीय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT