MH CET Result 2025 Saam Tv
महाराष्ट्र

MH CET Result 2025: बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MH CET चा निकाल जाहीर

PCM Group MH CET Result 2025 Announced: बारावीनंतर इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. MH CETचा निकाल जाहीर झाला आहे.

Siddhi Hande

संजिव भागवत, मुंबई प्रतिनिधी

बारावीनंतर चांगले करिअर करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थी विविध विषयांसाठी स्पर्धा परीक्षा देतात. दरम्यान, नुकताच MH-CET चा निकाल जाहीर झाला आहे. इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी शाखेत प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता PCM ग्रुपचा MH-CET चा निकाल जाहीर झाला आहे. (MH-CET Result 2025 Declared)

PCM ग्रुपचा निकाल जाहीर झाला आहे. www.mahacet.org या वेबसाइटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकतात. हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला फक्त सीट नंबर आणि आवश्यक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसणार आहे.

PCM ग्रुपसाठी ४६४२६३ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. यातील 422663 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ५ मे रोजी ही परीक्षा झाली होती. महाराष्ट्राचा निकाल 91.04% टक्के झाला आहे.राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी PCM ग्रुपमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.

१०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी

Press Note MHT-CET (PCM Group) 2025.pdf
Preview

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतली होती. इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षा द्यावी लागते.या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तर PCB ग्रुपचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.

निकाल कसा पाहाला (MH CET Result Online Check Process)

सर्वात आधी तुम्हाला https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला MHT-CET 2025 या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर PCM Group निवडा.

यानंतर मेल आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

यानंतर तुम्हाला निकाल दिसेल. तुम्ही तुमचे स्कोअरकार्ड डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT