Pune Mhada Lottery 2024  Saam TV
महाराष्ट्र

Mhada Lottery: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाकडून मुदतवाढ; या तारखेपर्यंत करु शकता अर्ज

Pune Mhada Lottery: पुण्यात हक्काचे घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत घरांसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपले स्वतः चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. परंतु मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात घर घेणं हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही आहे. त्यामुळेच अनेकजण म्हाडाचा फॉर्म भरतात. म्हाडामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरी तयार केली जातात.तर म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

म्हाडाच्या पुणे विभागाकडील घरांच्या सोडतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिक ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

दरम्यान,म्हाडाच्या ६ हजार २९४ घरांसाठी आतापर्यंत सुमारे ६८ हजारांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली आहे.(Pune Mhada Lottery)

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची सुरुवात १० ऑक्टोबर २०२४ पासून झाली होती. या घरांसाठी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे अनेक नागरिकांना म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता आले नाही. त्यामुळे मुदतवाढ करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर म्हाडाने अर् करण्याची मुदत वाढवली आहे.

नागरिकांनी मागणी मान्य करुन म्हाडाने या सोडतीस १० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ केली होती. मात्र, नागरिकांकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळेच म्हाडाने सोडतीसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज भरण्याची संधी नागरिकांना दिली आहे. इच्छुक नागरिकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. (MHADA Lottery Application Date Extended)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT