Closed-door negotiations lead to BJP leader Gokul Gite’s withdrawal, while rebellion brews in Jalgaon. saam tv
महाराष्ट्र

म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणावरून राजकारण फिरलं? दिग्गज नेत्याची विधानपरिषद निवडणुकीतून अचानक माघार, बंद दाराआड काय ठरलं?

Maha Alliance Rift Gokul Gite Withdrawal Nashik Council Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून महायुतीत चांगलाच वाद पेटला होता. बंडखोरी शमवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. अशातच नाशिकमधील बंडखोरी शमली असली तरी जळगावमध्ये शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवारानं निवडणुक लढवण्याची ठाम भूमिका घेतलीय. महायुतीत कशी धुसफूस सुरु आहे ? पाहूयात...

Suprim Maskar

गेल्या आठ दिवसांपासून नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या हायव्होल्टेज 'पॉलिटिकल ड्रामा'वर अखेर पडदा पडलाय. भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने शिदेंसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा दिलासा मिळालाय. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट गित बंधूंचं घर गाठलं. आणि गिते बंधू आणि दराडे बंधूंना समोरासमोर बसवून तब्बल तासभर चर्चा केली. त्यानंतर गोकुळ गीतेंनी माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. मात्र, गीतेंच्या या माघारीमागे महायुतीचं 'दबावतंत्र' असल्याची चर्चा रंगली.

मंत्री गिरीश महाजन जरी म्हाडाच्या नोटीशीचा संबंध नाकारत असले, तरी पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजल्याची चर्चा आहे. 1 जूनला गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि त्याच दिवशी, राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांचे एक पत्र समोर आलं. ज्यामध्ये नाशिकच्या म्हाडा प्रकरणात गणेश गीते यांना उच्च न्यायालयानं मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी तातडीने सुप्रीम कोर्टात जाण्याच्या लेखी सूचना अतिरिक्त सरकारी वकीलांना देण्यात आल्या. त्यामुळे गिते बंधूंवर माघारीसाठी दबाव टाकल्याची चर्चा रंगली. नाशिकचा तिढा मिटला असला तरी जळगावमध्ये मात्र शिंदेसेनेच्या रेश्मा काळे या निव़डणूक लढण्यावर ठाम आहेत.

महायुतीच्या ६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर नाशिकच्या जागेवर आता केवळ विजयाची औपचारिका बाकी आहे. मात्र जळगावच्या जागेचा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT