मतीमंद मुलींनी बनवल्या आकर्षक गणेश मूर्ती आणि पर्यावरण पूरक राख्या कैलास चौधरी
महाराष्ट्र

मतीमंद मुलींनी बनवल्या आकर्षक गणेश मूर्ती आणि पर्यावरण पूरक राख्या

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर स्वआधार मतिमंद मुलीसाठीचे वसतिगृह आहे. याठिकाणी शंभरपेक्षा अधिक मुली वास्तव्यास आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी, उस्मानाबाद

उस्मानाबाद - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व शाळा अजूनही बंद आहेत. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू आहे. मात्र या दरम्यान आई-वडीलांपासून पोरकी झालेली मुलं अजुनही शाळेतच आहेत आणि ते आपल्या कला गुणांना वाव देत आहेत. (mentally retarded girls made Attractive Ganesha idols and eco-friendly rakhis)

हे देखील पहा -

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर स्वआधार मतिमंद मुलीसाठीचे वसतिगृह आहे. याठिकाणी शंभरपेक्षा अधिक मुली वास्तव्यास आहेत. आई-वडिलांपासून पोरक्या झालेल्या अनाथ मुलींचा येथे सांभाळ केला जातो. शहाजी चव्हाण या संस्थेच्या माध्यमातून हे काम करतात आणि या मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन देतात.

ज्यांचा बुद्यांक कमी असतो अशा मुलांना मतिमंद म्हटले जाते,अश्या मुलांना वेडे म्हणून हिणवले जाते. मात्र त्यांनी बनवलेल्या गणेशमूर्ती आणि राख्या पहिल्या तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या मुलींनी चक्क पर्यावरण पूरक राख्या बनवल्या आहेत. तसेच या बनवलेल्या राख्या इतर शाळेतील मुलांना मोफत वाटल्या जातात.

या अनाथ मुलींसाठी आई, बाबा घर आणि परिवार म्हणजेच हे वसतिगृह आहे. त्यांनी या शाळेतच राहून वेगवेगळे पारितोषिके मिळवली आहेत. येथेच त्यांना गायनाची देखील आवड निर्माण केली जाते. बौद्धिक क्षमता कमी असली शिक्षकांनी शिकवलेल काम आणि दिलेली जबाबदारी या मुलींच्या हातांनी पार पाडली आहे. मुलींनी मातीपासून आकर्षक गणेश मूर्ती आणि वेगवेगळ्या झाडांच्या बियांपासून राखी पौर्णिमा निमित्त राख्यांची निर्मिती केली आहे

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rutuja Bagwe Photos: हाय गर्मी! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोशुटने वातावरण तापवलं...

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' ने रचला इतिहास; भारतात १००० कोटी कमावणारा पहिला चित्रपट, तिसऱ्या रविवारी छप्परफाड कमाई

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत मोठी खेळी;बलाढ्य नेत्याची पोटनिवडणुकीतून माघार

Shubh Muhurat April 2026: लवकरच संपणार खरमास, सुरु होणार लग्नाची धामधूम, वाचा एप्रिल महिन्यातल्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT