Melghat tragedy: 34-day-old baby burned with hot sickle during superstitious treatment. File Pic
महाराष्ट्र

Melghat Horror : उपचारापोटी 34 दिवसाच्या बाळाच्या पोटावर दिले चटके, मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Melghat 34-Day-Old Infant Suffered Burns: मेळघाटमध्ये एका ३४ दिवसांच्या बाळाला उपचाराच्या नावाने गरम विळ्याने पोटाला चटके देण्यात आल्याची घटना घडलीय. आरोग्य पथकाने या अमानवी प्रथेचा पर्दाफाश केला आहे, ज्यामुळे आदिवासी भागात मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

Bharat Jadhav

मेळघाटातील चौपन गावात 34 दिवसांच्या बाळावर अघोरी उपचाराचा प्रकार उघडकीस आला.

भूमकाने बाळाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिले.

वैद्यकीय पथक आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

अशा अंधश्रद्धापूर्ण घटना मेळघाटात यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत.

अमर घटारे, साम प्रतिनिधी

मेळघाटातील अतिदुर्गम चौपन गावात अघोरी उपचाराचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. केवळ 34 दिवसांच्या बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके दिल्याची घटना घडल्याचं समोर आले आहे. तीन दिवसांपासून शौच होत नसल्याने बालकास भूमकाकडे नेण्यात आले होते. तथाकथित उपचाराच्या नावाखाली भूमकाने बाळाला विळ्याने चटके दिले.

दरम्यान, वैद्यकीय पथक गावात दाखल झाल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला. दरम्यान या आधीही अनेकवेळा असे प्रकार घडले पण अजूनही हे प्रकार थांबता थांबे ना. चौपन हे गाव मेळघाटातील हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. 1 सप्टेंबरला आरोग्य केंद्रातील डॉ. सांगवीकर आणि त्यांची चमू नियमित क्षेत्रभेट अंतर्गत आठवड्यातून एकदा गावांची तपासणी करण्यासाठी गेली होती.

तेव्हा तिथे त्या बाळाकडे लक्ष गेले. अवघ्या 1 महिना 4 दिवसांच्या या बाळाचे पोट फुगलेले होते. पोटावर काळे डाग आणि चट्टे होते. गावातील भूमकाकडे नेल्याचे आई वडिलांनी डॉक्टरला सांगितले.. भूमकाने गरम लोखंडी दरातीने बाळाच्या पोटावर डाग दिले पण तरीही फरक पडला नाही, असे ते म्हणाले.. हे ऐकताच वैद्यकीय पथकाने तत्काळ बाळाला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून लगेच बाळाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्याला रेफर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT