मेळघाटात तळश्याचा वावर! नागरिकांवर प्राणघातक हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती  Saam Tv
महाराष्ट्र

मेळघाटात तळश्याचा वावर! नागरिकांवर प्राणघातक हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती

धारणी तालुक्यातील मागील काही दिवसांपूर्वी सुसर्दा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बिबामल गावांमध्ये तळश्याने धुमाकूळ घालून, गावकऱ्यांना जखमी केले होते.

अरुण जोशी

अमरावती : धारणी तालुक्यातील मागील काही दिवसांपूर्वी सुसर्दा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बिबामल गावांमध्ये तळश्याने धुमाकूळ घालून, गावकऱ्यांना जखमी केले होते. पुन्हा याच तळश्याने आता परसोली, कासमार आणि खिडकी, ततरा गावातील नागरीकांवर प्राणघातक हल्ला चढविला आहे.

हे देखील पहा-

या हल्ल्यामध्ये २ चिमुकल्यांसह एकुण ५ जणांना जखमी केले आहे. या घटनेत संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तातरा निवासी मिरकु ओंकार जांबेकर (वय- ३८) हिला कासमार नजीक तळश्याने हल्ला चढवुन जखमी केले आहे. तर आपल्या आई- वडीलांसह मैय्यत कार्यक्रम करिता परसोली जात असतांना चिमुकल्या रोशणी मगन मावस्कर (वय- ८) आणि सलोनी मगन मावस्कर (वय-६) इतर अन्य २ पुरुषांवर तळश्याने प्राणघातक हल्ला चढविला आहे.

खिडकी कासमार तातरा झिलांगपाटी या गावांमध्ये नागरिकांना सावध राहण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे. तळस पिसाळला असल्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. सुसर्दा वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांनी सर्व जखमींना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात येत आहेत.

तसेच वरिष्ठांना माहिती देऊन पिसाळलेल्या तळसला ट्रंगुलाईज करण्याबाबत कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. याप्रसंगी प्रहार संघटनेचे दिलीप चतुर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष रमेश धांडे यांनी जखमी नागरिकांना उपचार देण्याकरिता विशेष सहाय्य करून मदत करण्यात आली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशीद नाही तर मंदिरच'; धार भोजशाळेला विवादावर उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काजू-आंबा उत्पादक आक्रमक, मंत्रालय परिसरात गोंधळ; राजू शेट्टी अन् महादेव जानकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Pakistan : मोठी बातमी! पाकिस्तानच्या लष्करी कॅम्पवर हल्ला, १५ सैनिकांचा मृत्यू

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा कर्णधार पुन्हा बदलणार; पुढच्या KKR विरूद्धच्या सामन्यात 'हा' खेळाडू सांभाळणार धुरा

Maharashtra News Live Update: शिवालयाबाहेर आंबा उत्पादकांंचं आंदोलन

SCROLL FOR NEXT