Melghat Crime google
महाराष्ट्र

Melghat Crime: मेळघाटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अंधश्रद्धेतून नग्न धिंड काढली, महाराष्ट्रात चाललंय काय?

Melghat News: मेळघाटातील एका वृद्धेच्या बाबतीत क्रूर घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून वृद्धेची नग्न धिंड काढण्यात आली. या अनोख्या घटनेमुळे ग्रामीण भागातील अंधश्रद्धेच्या आणि त्याच्या धोकादायक प्रथा यांच्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Dhanshri Shintre

अंधश्रद्धा समूळ नष्ट होण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती सुरु असते. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे. मात्र तरीही जादूटोण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. मेळघाटातील एका वृद्धेच्या बाबतीत क्रूर घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून वृद्धेची नग्न धिंड काढण्यात आली. दोरखंडाने बांधलं, चटके दिले. पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय?

महाराष्ट्रातल्या सगळ्याच संतांनी लोकांचं प्रबोधन करत अंधश्रद्धेवर, बुरसटलेल्या परंपरांवर प्रहार केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही सामाजीक संस्थाही सातत्यानं जनजागृती करत असतात. मात्र तरीही शहरापासून ते खेड्यापर्यंत करणी, जादूटोणा असे प्रकार घडत आहेत. अशीच एक राज्याला हादरवणारी घटना मेळघाटात घडली आहे.

जादूटोणाच्या संशयावरून ७७ वर्षांच्या वृद्धेची नग्न धिंड काढण्यात आली आहे. एवढंच नाही तर तीला सळईचे चटके आणि मिरचीची धुरा देण्यात आली. तोंडालाही काळं फासण्यात आलं. चिखलदरा तालुक्यातल्या रेहट्याखेडा गावातला हा धक्कादायक प्रकार आहे. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यावेळी संपूर्ण गाव आहे केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. या क्रूर घटनेनंतर पोलिसांनी फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय.

राज्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा आहे. या कायद्यातल्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही. या पीडित महिलेच मुलांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपबिती सांगितली. मारहाणीनंतर ही वृद्ध सोनोरी येथे मुलीकडे राहायला गेली. याच कुटुंबाच्या चार एकर शेतात पोलीस पाटलांनी अंगणवाडी बांधल्याचा आरोपही केला जात आहे. पोलीस पाटीलचा या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे.

नुकतंच जालना जिल्ह्यातील गोंदी गावात झेडपीच्या शाळेत जादूटोण्याचा प्रकार घडला होता. देशात अग्रेसर असलेला महाराष्ट्र अनेक बाबतीत आदर्श आहे. मात्र दुर्गम भागातील काही घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राला धक्का बसत आहे. यासाठी प्रभावी जगजागृतीची गरज आहे. आणि कायद्याच्या कडक अंमलबजावणीही आवश्यकता आहे. तरच अशा घटनांवर अंकूश बसू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

SCROLL FOR NEXT