राष्ट्रवादीला हरवण्यासाठी शिवसेना-भाजपची युती; राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्षांचा आरोप Saam TV
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला हरवण्यासाठी शिवसेना-भाजपची युती; राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्षांचा आरोप

'शिवसेनेचा विचार डावलून गद्दारी केली याचा विचार शिवसेना करेल काय ?'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिरुर : शिरुर कासार नगरपंचायत (Shirur Kasar NagarPanchayat) मध्ये राष्ट्रवादीला हरवण्यासाठी शिवसेना भाजपची छुपी युती आज उघड झाली. आज भाजपा सोबत अधिकृत गटात शिवसेना (Shivsena) नगरसेवक गेले! त्यांच्या या भाजपा सोबत जाण्याने निवडणुकीच्या पूर्वीच असलेल्या छुप्या युतीचे कारस्थान जनतेच्या समोर व पक्षनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या समोर उघड झाले आहे. यांच्या स्वार्थी छुप्या युतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ६ जागा पाडण्याचे काम केले अशी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांनी केली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढं लिहंल आहे, पडद्यामागचे कारस्थान आज शिवसैनिकांच्या समोर उघडे पडले हे बरं झालं. कारण शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेब हे भाजपाला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी एकीकडे कष्ट घेत आहेत; तर दुसरीकडे त्यांच्या पक्षातील स्वार्थी नेते/ माज़ी मंत्री निवडणुकीच्या पूर्वीच भाजपच्या माज़ी मंत्र्या सोबत छुपी युती करत होते. आज हेच अतिनिष्ठावंत लोक निकालाच्या नंतर उघड भाजपा सोबत जात नवा संसार थाटत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी दोन माजी मंत्र्यांना एकत्रित यावे लागले, सेनेचा विचार डावलून गद्दारी केली याचा विचार शिवसेना करेल काय ? हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगाची आठवण शिवसेना 'अंधारात साटेलोटे करून, उजेडात मोथुर लावणाऱ्या' बीडच्या नेत्याला करुन देणार का ? हा यक्ष प्रश्न पडला आहे असं त्यांनी लिहंल आहे तर त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT