Mega Block: राज्यात नुकताच मान्सून दाखल झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेनवर याचा परिणाम होतोय. मुंबईकडे कामासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूकीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. अशात पालघरमधील नागरिकांना आज प्रवासासाठी आणखी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (Latest Marathi News)
वाणगावमध्ये मेगा ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी ८.३० ते १०.१५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे . या मेगाब्लॉकमुळे अप मार्गावरील तीन तर डाऊन मार्गावरील तीन अशा सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत . यामध्ये चार उपनगरीय लोकल तर दोन लांब पल्याच्या शटलचा समावेश असणार आहेत .
सकाळी घेतल्या जाणाऱ्या या मेगाब्लॉकमुळे (Mega Block) पालघरमधून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे.वाणगाव रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जुन्या पुलाचं काम हाती घेण्यात येणार असल्याने हा मेगा ब्लॉक असणार आहे.
पालघरहून (Palghar) मुंबईच्या दिशेने अनेक नागरिक सकाळी कामानिमित्त येत असतात. सकाळी लोकल रद्द करण्यात आल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय.
पालघरला यलो अलर्ट
कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, सातारा, नाशिक, या सर्वच शहरांमध्ये पुढचे ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच पालघर, ठाणे आणि मुंबईसाठी २६ ते २८ जून या दिवसांत देखील अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तीन दिवस या शहरांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.