Shivsena News Saam TV
महाराष्ट्र

Shivsena News: शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटाच्या खासदारांची दिल्लीत बैठक, कोणत्या विषयावर चर्चा?

दिल्लीत शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र बैठक पार पडली.

Shivaji Kale

नवी दिल्ली : राज्यात नागपुरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे गाजत आहेत. ज्यामध्ये प्रामुख्यने शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आमने सामने दिसत आहेत. मात्र दुसरीकडे दिल्लीत शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र बैठक पार पडली. (Shivsena News)

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीमान्याची मागणी केली आहे. तर सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या पुन्हा चौकशीची मागणी केली. या प्रकरणात AU कोण असा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे.

राज्यात आमने-सामने असलेला शिंदे-ठाकरे गट दिल्लीत मात्र एकत्रित दिसत आहे. दोन्ही गटाच्या खासदाराची संसदेच्या शिवसेनेच्या दालनात बैठक पार पडली.

बैठकीत खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई दिसत आहेत. शिंदे गटाचे बंड झाल्यानंतर दोन्ही गटाचे खासदार पहिल्यंदा एकत्र दिसले.

कोणत्या विषयावर चर्चा?

शिवसेना पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पगार मागील पाच महिन्यांपासून थकला आहे. संसदीय पक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर राहुल शेवाळे यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानं हे पगगार थकले आहेत. हे शिवसेनेच्या खासदारांचे कार्यालयीन खाते आहे.पगार काढण्यासाठी विनायक राऊत आणि अनिल देसाई यांची सही आवश्यक असते.

राहुल शेवाळे यांनी खात्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानं खात्याला स्टे आला आहे. खात्यावर घेतलेले ऑब्जेक्शन विथड्रा करावं, यावरुन ठाकरे गटाने राहुल शेवाळे यांना सुनावलं आहे. तुमच्या ऑब्जेक्शनमुळं पगार थकले, असा आरोपही ठाकरे गटाच्या खासदारांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT