Yavatmal Collage  Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News : यवतमाळमध्ये डॉक्टर विद्यार्थिनीची आत्महत्या; वसतीगृहातच संपवलं जीवन

Medical Student End her Life : सुहानी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. घटनेची उस्मानाबाद येथे राहणाऱ्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे, असं महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी सांगितले.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

Yavatmal News :

यवतमाळमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. सुहानी ढोले असं मृत विद्यार्थिनीचं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सुहानीच्या आत्महत्येने तिचे नातेवाईक, मित्र, शिक्षक यांना धक्का बसला आहे. (Latest News)

सुहानी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. घटनेची उस्मानाबाद येथे राहणाऱ्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे, असं महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांनी सांगितले.

यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सुहानीने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने अकॅडमीच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. श्रीकांत दशरथ वाघ असं मृत तरुणाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरातील ही घटना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT