Sting operation reveals shocking gap between medicine MRP and actual distributor price, exposing pharmacy overcharging. saam tv
महाराष्ट्र

मेडिकल स्टोर बनतायत लुटीचं केंद्र, कंपन्यांच्या डिस्काऊंटपासून रुग्ण वंचित

Medicine Loot Uncovered: अव्वाच्या सव्वा औषधांच्या किंमतीतून मेडिकल स्टोर लुटीचे अड्डे बनत आहेत... त्याचा साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश झालाय... साम टीव्हीनं मेडिकल स्टोर रुग्णांचे कसे खिसे कापतात... त्याचाच पर्दाफाश करणारं साम टीव्हीचं, इन्व्हेस्टिगेश ऑपरेशन औषध बाजार पाहूयात...

Bharat Mohalkar

हॉस्पिटलचं नाव काढलं तरी अनेकांची धडकी भरते... मेडिकल दुकानदार तर गोचिडानं रक्त शोषावं तसं औषधांच्या अव्वाच्या सव्वा किंमतीच्या माध्यमातून रुग्णांचं शोषण करतात.... त्याची माहिती साम टीव्हीला मिळाली.. त्याची खात्री करण्यासाठी आणि औषधांच्या किंमतीमागचं गूढ जाणून घेण्यासाठी साम टीव्हीनं मेडिकल एजन्सीमधून औषधांचं रेटकार्ड मिळवलं...

डायक्लोटल एएमपी इंजेक्शनची एमआरपी 27 रुपये 65 पैसे आहे... मात्र एजन्सीत एक इंजेक्शन केवळ 6 रुपये 75 पैशांना मिळत आहे...

पायरेजेसिक गोळ्यांची स्ट्रिपची एमआरपी 14 रुपये 49 पैसे आहे... मात्र एजन्सीत 11 रुपये 4 पैशांना मिळते..

पॅन्टिन 40 mg आयव्हीची 53 रुपये 70 पैसे एमआरपी आहे... मात्र एजन्सीत केवळ 40 रुपये 91 पैशांना मिळते...

याबरोबरच टेल्मा 40 एमजी टॅब्लेटची एमआरपी 106 रुपये 47 पैसे असताना ते एजन्सीत 81 रुपये 12 पैशांना मिळते...

औषधांच्या एमआरपी आणि एजन्सीचा दर यात 20 ते 75 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत असल्याचं समोर आलं... त्यामुळे दुकानदारांना मिळणारा डिस्काऊंट रुग्णांपर्यंत पोहोचतो का? याचा शोध घेण्यासाठी साम टीव्हीनं छत्रपती संभाजीनगरमधील मेडिकल दुकानांमध्ये जाऊन खात्री केली...त्यावेळी आमच्याकडे डिस्काऊंटची पॉलिसीच नाही, असं मेडिकल दुकानदारानं सांगितलंय... आम्ही एकाच नाही तर छत्रपती संभाजीनगरमधील वेगवेगळ्या मेडिकल दुकानात गेलो... त्यावेळी काही मेडिकल दुकानात विनंती केल्यानंतर 10-15 टक्के डिस्काऊंट देण्याची तयारी दाखवली...

हे फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही... तर या लुटीचं लोण बीड जिल्ह्यातील मेडिकलमध्येही पसरलंय.. साम टीव्हीनं बीडमधील एजन्सीत जाऊन औषधं घेतली...त्यावेळी डोलो गोळीची स्ट्रिप कितीला मिळते... पाहा....

डोलो 650 mg

MRP- 32.12 रुपये

एजन्सी रेट- 24.47 रुपये

टेल्मा 40 mg

MRP- 108.36

एजन्सी रेट- 82.56

साम टीव्हीचा प्रतिनिधी एजन्सीतून औषधं खरेदी केल्यानंतर अवाजवी नफेखोरीचा पर्दाफाश करण्यासाठी मेडिकल दुकानात पोहोचला.. त्यावेळी काही दुकानदारांनी औषधांच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देणं मान्य केलं...

तुम्ही या सगळ्या खेळाकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला सगळं एमआरपी नुसार सुरु असल्याचं दिसेल... मात्र एजन्सी मेडिकल दुकानांना फक्त डिस्काऊंटच नाही तर वेगवेगळ्या ऑफरही देते...

आपण उदाहरणादाखल पेन्टा 40 एमजी हे इंजेक्शन घेऊ... यात पेन्टा 40 एमजी या 10 इंजेक्शनची MRP – 537 रुपये…आहे.. डिस्काउंटनंतर किंमत – 409 रुपये…

आणि त्यावर 25 इंजेक्शन फ्री दिले जातात... त्यामुळे एका इंजेक्शनची किंमत 11 रुपये 68 पैसे इतकीच होते..

खरंतर कंपन्या, एजन्सी मेडिकल दुकानांना 20 ते 75 टक्क्यांपर्यंत सूट देते... मात्र हा फायदा गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहोचतच नाही... त्यामुळेच आभाळाला भिडणाऱ्या औषधांच्या किंमतीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या पोटात खड्डा पडतो... आता प्रश्न असा आहे की, मेडिकल दुकानांच्या या अव्वाच्या सव्वा नफेखोरीवर नियंत्रण कोण आणणार? रुग्णांना योग्य दरात औषधं मिळणार का? याबाबत आता सरकारी पातळीवरच धोरण ठरवायला हवं... आणि लुटीचा गोरखधंदा करणाऱ्या मेडिकल दुकानांना चाप लावायलाच हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध बॉडीबिल्डरची आत्महत्या, जिममध्ये येणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध; नंतर...

Nashik Conversion Case: नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद; TCS ने घेतली गंभीर दखल, VIDEO

लातूरमध्ये शिक्षणसम्राटांकडून पालकांची लूट, 'साम टीव्ही'चं ऑपरेशन शिक्षण माफिया

पगारवाढीसाठी कंपनीत दंगल, कंपनीवर 'डबल गेम'चा आरोप

सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा, निवडणूक बारामतीची, चर्चा मुख्यमंत्रिपदाची

SCROLL FOR NEXT