Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : पवना नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू; मित्रांसोबत पोहायला गेला असतानाची घटना

Maval News : अंगाची लाहीलाही होत होती. या उष्णतेपासून सुटका मिळावी यासाठी नदी, तलावात पोहण्यासाठी अनेकजण जात असतात

दिलीप कांबळे

मावळ : उन्हाळ्याचे दिवस असल्याने नदी. तलावात पोहायला जाण्याचे अनेकजण पसंद करत असतात. त्यानुसार काही मित्र पवना नदीत पोहण्यासाठी गेले असताना यात एकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना (Maval) मावळमध्ये घडली आहे. 

मावळात गहूंजे गावातील पवना नदीत बुडून निखिल यादव या तरुणाचा मृत्यू (Death) झाला आहे. गेली आठ दिवसांपासून वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता. तर अंगाची लाहीलाही होत होती. या उष्णतेपासून सुटका मिळावी यासाठी नदी, तलावात पोहण्यासाठी अनेकजण जात असतात. अशाच प्रकारे निखिल यादव याने मित्रानं सोबत पोहण्याचा बेत आखला. पण त्याच्यासाठी तो आयुष्याचा शेवट ठरला. सर्व मित्र पोहण्यासाठी नदीत उतरत पोहण्याचा आनंद घेत होते. 

दरम्यान पोहत असताना पवना नदीतील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने निखिल याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेबाबत त्याच्या मित्रांनी गावात माहिती दिली. यानंतर वन्यजीव रक्षक मावळ आणि लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होत तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT