Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तरुणांवर काळाचा घाला; पवना धरणात बुडून दोघांचा मृत्यू

Maval News : बालेवाडी पुणे येथे स्केन रीयालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीला असलेले आठ मित्र पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते.

दिलीप कांबळे

मावळ : पवना धरण परिसरात अनेकजण पर्यटनासाठी येत असतात. त्यानुसार धरण परिसरात फिरण्यासाठी मित्र मंडळी आले होते. यातील दोन तरुणांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरची घटना दुधीवरे येथे घडली. तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमने शोधकार्य सुरु केले होते. 

मयूर रवींद्र भारसाके व तुषार रवींद्र अहिरे अशी धरणात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. बालेवाडी पुणे येथे स्केन रीयालिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीला असलेले आठ मित्र पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. फिरत असताना दुधीवरे येथे सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहत असताना मयूर आणि तुषार यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. 

आपले मित्र बुडत असल्याचे पाहून त्यांच्या मित्रांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना वाचविण्यात यश आले नाही. काही क्षणात दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान मयूर आणि तुषार यांच्या मित्रांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना दोघे मित्र बुडाल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ रेक्स्यु टीमला घटनेची माहिती देत घटनास्थळी पोहचण्यास सांगितले. 

यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिस व शिवदुर्ग रेस्क्यू टीम पावन धरण परिसरात घडलेल्या घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात शोधकार्य घेत रेस्क्यू टीमने दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT