Maval Crime Saam tv
महाराष्ट्र

Maval Crime : तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांगलादेशी घुसखोर ताब्यात; सहा महिन्यांपासून होते वास्तव्यास

Maval News : नवलाख उंबरे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहत असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे आली त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास केला असता त्यांना हे तीन बांग्लादेशी इसम आढळून आले

दिलीप कांबळे

मावळ : राज्यातील वेगवेगळ्या भागात सध्या बांग्लादेशींना ताब्यात घेतले जात असल्याची कारवाई केली जात आहे. तर आता मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे गावातून तीन बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे. पोलिसांनी यांना ताब्यात घेत चौकशी करत आहेत.

मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथे मागील सहा महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास होते. नवलाख उंबरे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक राहत असल्याची तक्रार तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे आली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास केला असता त्यांना हे तीन बांग्लादेशी इसम आढळून आले. या इसमाकडे कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यांच्याकडे बांग्लादेश मधील रहिवासी पुरावे मिळून आले. 

आधार आणि पॅन कार्डही आढळले 

त्यानंतर पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हुसेन शेख, मोनिरुल गाठी, अमीरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी इसमांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांकडे आधार कार्ड व पॅन कार्ड देखील सापडून आले आहे. अर्थात सहा महिन्यांपासून वास्तव्यास असताना या बांगलादेशी इसमांना भारतीय आधार कार्ड व पॅन कार्ड कोणी दिले; याबाबतचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव करत आहेत.

पोलिसांनी रेतीचे सात ट्रॅक्टर पकडले
भंडारा
: भंडारा जिल्ह्याील तुमसर तालुका रेती तस्करांसाठी प्रमुख केंद्र ठरत आहे. जिल्ह्यातील नव्हे तर लगतच्या प्रदेशातील रेती तस्करांचा तुमसर तालुक्यात मोठा धुमाकूळ आहे. रेती तस्करांचा सर्वसामान्य नारिकासह शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीत आलेसूर शिवारात गस्तीवर असताना बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या सात ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी ३५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून सात ट्रॅक्टर चालक व मालक यांचेविरूध्द गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT