Maval Crime News Saam tv
महाराष्ट्र

Maval Crime News: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवत लुटमार; एलसीबी पथकाकडून तीनजण ताब्यात

Maval News : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवत लुटमार; एलसीबी पथकाकडून तीनजण ताब्यात

दिलीप कांबळे

मावळ : रात्रीच्या वेळी रहदारी नसलेल्या रस्त्यावर अडवून लूटमार केली जाते. परंतु मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरच लूटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. (Maval) कामशेतच्या हद्दीमध्ये असलेल्या बहुवरखंड या ठिकाणी रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून ट्रक चालकाला अडवून मारहाण करत (Robbery) लुटण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Maharashtra News)

ट्रक चालकाला मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार घडला होता. २० ऑक्टोबरच्या रात्रीच्या सुमारास बौर गावच्या हद्दीत मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे रोडने मुंबई लेनवरून जात असताना तीन अज्ञात इसमांनी ट्रक अडकून ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान केले. दरम्यान गाडीमध्ये चढून तक्रारदार यांना दगडाने डोक्यात मारून दुखापत केली तसेच तक्रार यांचा मुलगा गौरव याला कानाखाली मारून गाडी थांबवून तक्रारदार यांचे ताब्यातील चार हजार पाचशे रूपये रोख, चार हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, चार हजार पाचशे रुपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण (Crime) तेरा हजार रुपये किंमतीचा माल जबरीने चोरी करून चोरून नेला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई- पुणे एक्सेप्रेसवेवर घडलेल्या या धक्कादायक प्रकारात ट्रकवर दगडफेक करत अडविण्यात आले. यानंतर या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम दत्ता होजगे, धिरजी लहु कडू, प्रथमेश जितेंद्र कालेकर या तीन आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT