Maval NCP News Saam tv
महाराष्ट्र

NCP: राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन; अब्‍दुल सत्‍तारांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध

राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन; अब्‍दुल सत्‍तारांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध

दिलीप कांबळे

मावळ : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल केलेल्‍या बेताल वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यात (NCP) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने वडगावमधील तहसील कार्यालयावर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. (Tajya Batmya)

कृषिमंत्री अब्‍दुल सत्‍तार (Abdul Sattar) यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याच्‍या विरोधात मावळातील (Maval) राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच पेटून उठले आहेत. मावळातील पंचायत समिती कार्यालय वडगाव ते तहसील कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान ‘अब्दुल सत्तार हाय हाय’, सत्‍तारांवर गुन्हा दाखल करा. पन्नास खोके अब्दुल सत्तार ओके..अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या.

तर मुंबई– पुणे द्रुतगती मार्गही अडवू

दरम्यान अब्दुल सत्तार यांचा राजीनामा फडणवीस– शिंदे सरकारने घेतला नाही. तर आम्ही मुंबई– पुणे द्रुतगती मार्गही अडवून आंदोलन करू; असा इशारा मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT