Crime News Saam tv
महाराष्ट्र

शेतीचा जुना वाद; चुलत भावाने केला बहिणीचा खून

शेतीचा जुना वाद; चुलत भावाने केला बहिणीचा खून

दिलीप कांबळे

मावळ : शेतीच्या जुन्या वादातून चुलत भावाने बहिणीचा खून केल्याची घटना मावळमध्ये उघडकीस आली. कोयत्याने हातावर, डोक्यावर आणि तोंडावर वार करून बहिणीचा खून केला आहे. याबाबत साळू मारुती निसाळ यांनी वडगाव मावळ पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली. (maval news crime news Cousin murdered sister)

रविवारी मावळमधील तळपेवाडी या ठिकाणी (Crime News) मयत महिला फासाबाई निसाळ ह्या शेतामध्ये फरसबीची पेरणी करत होत्या. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्या गुरांना पाणी देण्यासाठी शेतीपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोठ्यात गेल्या. त्या आधीच गोठ्यात दबा धरून बसलेला वसंत माळी याने फासाबई यांच्या डोक्यावर, हातावर व तोंडावर कोयत्याने वार केले. त्यानंतर फासाबई या मयत झाल्याची खात्री करून माळी हा मागील जंगलात निघून गेला.

सर्व पुरावे केले नष्‍ट

तिथे असणाऱ्या ओढ्यात रक्ताने माखलेला शर्ट अर्धवट धुवून खून करण्यासाठी वापरलेला कोयता दगडांच्यामध्ये लपवला. खून केल्याचे सर्व पुरावे वसंत माळी याने नष्ट केले. मात्र पोलिसांनी शिताफीने या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने सर्व गुन्हा कबुल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT