Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News : अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ८०० फुटावरून झळकावला बॅनर; मावळातील तरुणांचे अनोखे साहस

Maval News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

दिलीप कांबळे

मावळ : राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र निकाल लागायला दहा दिवस उलटल्यानंतर देखील मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा आहे. दरम्यान आपलाच नेता मुख्यामंत्री व्हावा; अशी महायुतीतील तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. यात अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळमधील तरुणाने अनोखे साहस करत ८०० फूट उंचीवर जात बॅनर झळकावले आहे. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला असून (Mahayuti) महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत; अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीमध्ये अजूनही मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरु आहे. शिवाय मंत्रिमंडळ स्थापन करण्यास देखील विलंब होत आहे. यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून बॅनर झळकावत आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. 

८०० फुटावर लावला ३० फुटाचा बॅनर 

दरम्यान मावळातील तरुणाने अनोख्या प्रकारे आपली इच्छा व्यक्त केली आहे. (Ajit Pawar) अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे; अशा आशयाचा तीस फुटाचा मोठा बॅनर ८०० फुट उंचीच्या नागफणी कड्यावरून झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नागफणी कडा चढाईस आहे कठीण 

नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा चढाईला अतिशय दुर्गम व कठीण आहे. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते. परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे; हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

SCROLL FOR NEXT