Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval News: मुलगी झाली हो..वीस वर्षानंतर कुटुंबात आली मुलगी; फुलांची आरास करत स्‍वागत, गावात वाटली मिठाई

दिलीप कांबळे

मावळ : मावळमधील साळुंब्रे गावातील आगळे कुटुंबात वीस वर्षांनी मुलगी झाल्याने तिचे जंगी स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अवघे आगळे कुटुंब आपल्या चिमुकलीला बघण्यासाठी आसुसलेले होतं. वीस वर्षांनी मुलीची प्रतीक्षा संपल्याने कुटुंबीय आनंदी आहेत. (Letest Marathi News)

एकीकडे सोलापुरात मुलांना लग्नसाठी मुली भेटत नसल्याने मोर्चा काढण्याची वेळी आहे. तर दुसरीकडे वीस वर्षांनी कुटुंबात मुलगी झाली म्हणून जल्लोष्यात तीच स्वागत करण्यात आले. दोन्ही बाजू विरुद्ध जरी असल्या तरी त्या मुलींवर येऊन ठेपतायत. त्यामुळे गर्भलिंग चाचणी करून मुलींचा पोटातच जीव घेऊ नका.

सर्वांना मुलेच झाल्‍याने मुलीची होती प्रतिक्षा

भरत आगळे यांचे चार भाऊ. चार भावांमध्ये आतापर्यंत कोणालाही मुलगी झाली नव्हती. आगळे यांच्या तीन भावांच्या मुलांनाही मुलेच झाली. या दरम्‍यान भरत आगळे यांच्या मुलाचे गेल्या वर्षी लग्न झाले. त्यांच्या घरात मुलीच्या रूपाने एक कन्‍या रत्न जन्मास आले. मुलं काय आपल्या आई- वडिलांना त्रास देऊन बाहेर काढतात. मात्र मुलगी जीव लावते. त्यामुळे त्यांचा आनंद ओसंडून वाहतोय.

गावात वाटली बर्फी

मावळमधील साळुंब्रे गावातील आगळे कुटुंबाची वीस वर्षांची प्रतीक्षा संपली. त्यांच्या घरात तान्हुलीने जन्म घेतलाय. औक्षण करून तिच्या पाऊल वाटांवर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. घरात पै- पाहुण्यांनी तिला बघण्यासाठी गर्दी केलीय होती. सर्वांना पेढे आणि बर्फी भरवून आनंद द्विगुणित केला. वीस वर्षांनी कुटुंबात मुलगी झाल्याचा आनंद आगळे कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT