Brave locals from Sahyadri team rescue a dog stranded 200 feet deep in Matheran gorge after a dramatic 2-day ordeal.  Saam Tv
महाराष्ट्र

माथेरानच्या घाटात थरारक रेस्क्यू ऑपरेशन,कुत्र्यासाठी घातला चौघांनी जीव धोक्यात

Risking Their Lives for a Mute Soul: माथेरानमध्ये एक थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय. पण कोण्या व्यक्तीचं नाही तर एका कुत्र्याचं! चक्क 200 फूट खोल दरित 2 दिवस अडकलेल्या या कुत्र्याला 4 जणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवलंय.

Vaishnavi Raut

माथेरान... नाव घेतलं की समोर येतो हिरवागार निसर्ग, शांत वातावरण, हिल स्टेशन्स...इथे घडलेली एक घटना मात्र मुक्या जीवाचं मोल अधोरेखित करणारी....200 फूट खोल दरीत दोन दिवस अडकलेल्या निष्पाप प्राण्याच्या सुटकेसाठी चक्क चार जणांनी आपला जीव धोक्यात टाकला आणि अंगावर काटा आणणारं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. नेमकं काय घडलं?

माथेरानमधील लँडस्केप पॉइंटजवळ स्थानिक रहिवाशांना एका कुत्र्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या ऐकू आल्या. शोध घेतला असता 200 फूट खोल दरीत एक कुत्रा अडकलेला दिसला. खडबडीत खडकांवर, ओलसर मातीत हा कुत्रा आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता.

स्थानिकांनी लगेचच सह्याद्री मित्र आपत्कालीन पथकाला संपर्क साधला आणि आखण्यात आलं कुत्र्याचं रेस्क्यू ऑपरेशन. आधीच खोल दरी आणि त्यात पावसाने निसरडी झालेली माती आणि खडकांचे तीक्ष्ण कड यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. पण पथकातील चारही शूरवीरांनी हार मानली नाही. प्रत्येक पाऊल जपून टाकत ते कुत्र्यापर्यंत पोहोचले. कुत्र्याला बिस्किट दाखवलं. ते पाहून कुत्रा जवळ आल्यावर त्याला हार्नेसने बांधलं आणि सुरक्षितपणे वर आणलं.

एक चुकीचं पाऊल थेट दरीत अशी परिस्थिती असतानाही. कुशल नियोजनामुळे कुत्र्याला सुखरूप वर आणण्यात यश आलं. एकिकडे कुत्र्यांना अमानुष मारहाण करण्याचे, अत्याचार करण्याचे व्हिडीओ आपण पाहतो. पण त्याचवेळी भुतदयेची ही घटना अशा लोकांना झणझणीत चपराक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT