MNS , Raj Thackeray , 
महाराष्ट्र

MNS News: लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचा मास्टर प्लान; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

MNS Raj Thackeray News: पुढील आठवड्यात मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन जबाबदारी देणार असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मनसेमध्ये

Ruchika Jadhav

Mumbai News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात मनसेमध्ये मोठे बदल होणार असून भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळालीये. ज्या पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांनी कामे केली नाहीत त्यांच्या जागी नवीन चेहरे देण्यात येणार आहेत.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि विभाग अध्यक्ष यांना मतदार संघात मोठे कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन वर्षात राज ठाकरे नवीन चेहऱ्यांना संधी देणार. पुढील आठवड्यातच भाकरी फिरलेली दिसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील आठवड्यात मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नवीन जबाबदारी देणार असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मनसेमध्ये अशा पद्धतीने बदल करण्यात येणार आहेत.

अनेक ठिकाणी जी मंडळी काम करत आहेत तेथे त्यांना आणखी चालना मिळेल. ज्या व्यक्ती काम करत नाहीत त्यांना तेथेच थांबवले जाईल. प्रत्येक पक्षात ही प्रक्रिया होते त्याप्रमाणे आमच्या पक्षात देखील ही प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी होणं गरजेचं आहे. निवडणूक जिंकायची तर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्राउंडलेवला काम करणारा प्रत्येक सैनिक ताकदीचा असावा. त्यामुळे असा ताकदीचा सैनिक उभं करणं पक्षाचं काम आहे, हे काम पक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'ही लाडकी बहीण योजना? महाराष्ट्रातही युपी बिहारमधील प्रकार सुरू; मुली नाचवण्यावरून राज ठाकरे संतापले

Satej Patil : काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना अश्रू अनावर; कार्यकर्त्याशी बोलताना हुंदका भरला, VIDEO

Manoj Jarange News : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची माघार, कुणाचा होणार मोठा फायदा? VIDEO

Maharashtra News Live Updates: मोठी बातमी! महाराष्ट्र मध्यप्रदेश बॉर्डरवर पोलीसांना कारमध्ये 70 लाखांची रोकड

Maharashtra Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४०उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT