massive fire broke out at 14 mile logistics park on amravati road nagpur saam tv
महाराष्ट्र

नागपूर : एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल

या आगीच्या धूराच्या लाेटामुळे परिसरातील तसेच रस्त्यावरील नागरिकांनी एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्ककडे धाव घेतली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur :

नागपूर येथील चौदा मैल परिसरातील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्क (L&T Logistic Park Nagpur) येथे आज (गुरुवार) भीषण आग लागली. काही क्षणांतच आग भडकल्याने लॉजिस्टीक पार्क परिसरातून धूराचे लाेट दूरवरुन दिसू लागले. या आगीची माहिती अग्निशमन विभागास देण्यात आल्यानंतर तीन पाण्याचे टॅंकर घटनास्थळी पाेहचले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अग्निशमन पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीमुळे लॉजिस्टीक पार्कचे संपूर्ण पत्र्याचे शेड दबले गेले. यामुळे अग्निशमनच्या पथकाला पाण्याचा फवारा मारताना अडचणी येत आहेत.

या आगीच्या धूराच्या लाेटामुळे परिसरातील तसेच रस्त्यावरील नागरिकांनी एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्ककडे धाव घेतली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत लाखाेंचे नुकसान झाल्याची प्राथमिक उपलब्ध झाली आहे. या आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Health Care : दुधाशिवाय भरपूर कॅल्शियम देणारे पदार्थ कोणते? जाणून घ्या

Baramati Places: पुण्यापासून हाकेच्या अंतरावर बारामतीतील या 5 प्रसिद्ध ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT