Uddhav Thackeray News  
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरेंना बालेकिल्ल्यात जबरी धक्का, हुकमी एक्का भाजपाच्या वाटेवर

Uddhav Thackeray News : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबरी धक्का बसला आहे. उबाठा शिवसेनेचे डॉ. दिनेश परदेशी भाजपमध्ये परतणार आहेत, त्यांनी शिवसेनेला रामराम केलाय.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बालेकिल्ल्यात अर्थात छत्रपती संभाजीनगरात जबरी धक्का बसला आहे. वैजापूरमधील डॉ. दिनेश परदेशी यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ते काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेला जबरी धक्के बसले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, विदर्भात आणि मराठवाड्यात ठाकरेंचे शिलेदार साथ सोडत आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरू आहे. कोकणानंतर ठाकरेंचा बालेकिल्ला अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे, पण तिथेही गळती लागली आहे. (Thackeray's Fort Crumbles in Chhatrapati Sambhajinagar: BJP Welcomes Shiv Sena’s Dinesh Pardeshi)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम करीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. ठाकरेंकडून त्यांना वैजापूर विधानसभेचे तिकिट देण्यात आले होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा ते आज स्वगृही परतणार आहेत.

काही दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच सिल्लोडमध्ये भाजप सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये जाऊन निवडणूक विधानसभेची निवडणूक लढवणारे सुरेश बनकरही भाजपमध्ये स्वगृही परतले होते. डॉ. दिनेश परदेशी हे वैजापूरमध्ये अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत. सोबतच भाजपचा भाजपचा चेहरा म्हणून तिथे त्यांची ओळख होती. मात्र विधानसभा निवडणुकीत ती जागा शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशामुळे आता वैजापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे नेताच उरला नाही अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT