हत्याकांड! पैशाच्या वादातून चिरला गळा; दुसऱ्याला विटांनी ठेचले Saam Tv
महाराष्ट्र

हत्याकांड! पैशाच्या वादातून चिरला गळा; दुसऱ्याला विटांनी ठेचले

नागपूरात खून हे समीकरण चांगलेच चालत आहे. रोज एक तरी खून होत आहे, अशीच परिस्थिती शहरात आता निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर : नागपूरात Nagpur खून हे समीकरण चांगलेच चालत आहे. रोज एक तरी खून होत आहे, अशीच परिस्थिती शहरात आता निर्माण झाली आहे. काही ना काही कारणामुळे वाद उफाळून खून होत आहेत. मात्र, बुधवारी नागपूर जिल्ह्यात उमरेड Umred आणि नरखेड Narkhed तालुक्यात २ खून झाल्याच्या घटना घडले आहेत. दोन्ही खून हे पैशाच्या वादामधून झाल्याचे समोर आले आहे.

एकाचा पैशाच्या वादातून गळा कापला आहे तर, दुसऱ्याचा विटाने ठेचून खून करण्यात आला आहे. यामुळे नागपूर मध्ये चालंय तरी काय, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. नरखेड तालुक्यात खुनाची शृंखला थांबता- थांबत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. कायम सुरू असलेल्या खुनाच्या या साम्राज्य मध्ये आज पुन्हा एका घटनेने भर पडली आहे.

हे देखील पहा-

बेलोना Ballona मार्गावर परसोडी Parsodi शिवारामध्ये, ज्ञानेश्वर कळंबे याच्या शेतात बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहजाद अबुल लईक शेख (वय- ३०) याचा मृतदेह मॉर्निंग वॉकला करणाऱ्यांना नागरिकांना आढळला आहे. त्यापैकी एकाने याबाबत पोलिसांना Police माहिती दिली आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

शहजाद अब्दुल लईक शेख हा व्याजाने पैसे देत असत. पैशाच्या देवाण- घेवाणीवरून शहजादची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून, पुढली तपास जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात एपीआय API ब्रामदेव देशमुख हे करत आहेत.

या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही व्यक्तींनी शहजादकडून पैसे उधार घेतल्याची माहिती आहे. पैशाच्या वसुलीकरिता शहजादने २ संशयितांना शिवीगाळ केल्याचं तपासात आढळले आहे. चिडून २ संशयितांनी शहजादला घटनास्थळी बोलावून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही संशयित हे अमरावती जिल्ह्यामधील वरुड या ठिकाणचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येते आहे.

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उमरेड बायपास रोड, रेल्वे गेट नंबर २ याठिकाणी विटा डोक्यांवर मारून, मित्रानेच मित्राचा खून केल्याचं धक्कादायक घटना घडली आहे. घटनेमधील आरोपी आणि मृतात पैशाचा व्यवहार झाला होता. या व्यवहारावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला आहे. मृत हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता.

तो खूपवेळा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगून आलेला होता. परिसरात त्याची खूप दहशत होती. मृताचे नाव पिंट्या ऊर्फ प्रवीण विनायक कठाणे (वय- ३६) रा. उमरेड तर आशिष सुरेश गजभिये असे आरोपीचे नाव आहे. आशिष हा ओम पॉलीटेक्निक गेटच्या बाजूला राहत आहे. या दोघांमध्ये दुपारी पैशाच्या व्यवहारावरून वाद झालेला होता. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले होते. आरोपीने पिंट्याच्या डोक्यावर विटांचा प्रहार करून, त्याला जागीच लोळवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये? जून महिन्याच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT