15व्या वर्षी लग्न तर 16व्या वर्षी मातृत्व, उस्मानाबादेत बालविवाहाने घेतला जीव Saam Tv
महाराष्ट्र

15व्या वर्षी लग्न तर 16व्या वर्षी मातृत्व, उस्मानाबादेत बालविवाहाने घेतला जीव

कमी वयात लग्न आणि मातृत्वाने तिचा जीव गेला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद: लग्नाच्या वयाची योग्य वाट न बघता सामाजिक दबावाखाली मुलीचे लग्न लावून देण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. याची किंमत मुलींना चुकवावी लागते आणि कधी कधी तर ती जीव गमावून चुकवावी लागते. अशी दुर्दैवी घटना उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यात घडली आहे खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले आणि सोळाव्या वर्षी मातृत्व आलं अन् तिचा मृत्यू झाला...

हे देखील पहा-

या प्रकरणी कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह इतर सहा लोकांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर येथील अजित बोंदर या (वय 28) वर्षीय तरुणाशी करण्यात आला होता. कोरोना काळात 11 जून 2020 रोजी या दोघांचा विवाह सोहळा उत्तमी कायापुर येथे पार पडला. त्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आतच सदरील मुलगी गरोदर राहिली.

7 ऑक्टोंबर रोजी तिला बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 13 ऑक्टोंबर रोजी अशक्तपणामुळे तिला सोलापूर येथे हलवण्यात आले. यादरम्यान तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 14 ऑक्टोंबर रोजी तिचे सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. मात्र 15 ऑक्‍टोबर रोजी या अल्पवयीन मातेच्या निधन झालं. कमी वयात लग्न केल्याने आणि मातृत्व आल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी मुलीचे वडील भारत घुगे, (आई) चंद्रकलाबाई घुगे (मुलीचे काका) लक्ष्मण घुगे, राम घुगे तर (पती) अजित बोंदर, (सासू) जनाबाई बोंदर, (सासरा) धनराज बोंदर आणि (मुलीची मावशी) सुरेखा बोंदर यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा नुसार ग्रामसेवक देविदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

SCROLL FOR NEXT