Hingoli Crime संदिप नागरे
महाराष्ट्र

चार महिन्यापुर्वी लग्न, पतीने चारित्र्याच्या संशयावरुन चिरला पत्नीचा गळा

अलका आणि विश्वनाथ यांचा चार महिन्यांपुर्वी विवाह झाला होता हे हे दोघे पती-पत्नी शेतातील हळद काढणीच्या कामाला वसमत तालुक्यातील सारोळा गावच्या शेत शिवारामध्ये गेले होते.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli) वसमत तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने विवाह झाल्यानंतर, चारच महिन्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलका विश्वनाथ पोटे वय वर्ष २१ असं मयत पत्नीचे नावं आहे. तर विश्वनाथ पोटे वय वर्ष २३ असं आरोपी पतीचे नाव आहे.

अलका आणि विश्वनाथ यांचा चार महिन्यांपुर्वी विवाह (Marriage) झाला होता हे हे दोघे पती-पत्नी शेतातील हळद काढणीच्या कामाला वसमत तालुक्यातील (Vasmat taluka) सारोळा गावच्या शेत शिवारामध्ये गेले होते. मागील दोन दिवसांपासून या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन वाद देखील झाले होते. अशातच आज संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या विश्वनाथ याने आपल्याच पत्नीवर हल्ला करत तिच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करुन निर्घुण हत्या केली.

दरम्यान या घटनेनंतर आरोपी पती विश्वनाथ पोटे फरार झालाअसून या प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिसांनी मयत विवाहीत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके देखील रवाना केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT