Marathwada Water Storage Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Water Storage : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८५ टक्क्यांवर; मराठवाड्यातील इतर १० धरणांची स्थिती काय? वाचा एका क्लिकवर

Marathwada Water Storage latest Update : मराठवाड्यातील १२ धरणांतील पाणीसाठ्याची टक्केवारी समोर आलीय. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८५ टक्क्यांवर असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

डॉ. माधव सावरगावे

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज ८५ टक्क्यांवर पोहचला आहे. शिवाय बीड जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्प वगळता मराठवाड्यातील इतर धरण प्रकल्पा तील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागलीय. त्यामुळे मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता हळूहळू दूर होऊ लागली आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागामध्ये काही ठिकाणी सुरू आहे.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८५ टक्क्यांवर

आज जालना, संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आणखी पाऊस पडेल अशी शक्यता आहे. उसावर प्रकल्प आणि धरणांमधील पाणी साठ्यात चांगलीच वाढ (Marathwada Water Storage latest Update) होईल. पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनासाठी या पाण्याची मदत होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आपण मराठवाड्यातील १२ धरणांमध्ये एकूण किती पाणीसाठा आहे? हे सविस्तर जाणून घेवू या.

मराठवाड्यातील प्रमुख प्रकल्पांतील जलसाठा

मराठवाड्यातील पाणीसाठ्यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, जायकवाडी धरणामध्ये ८५ टक्के, निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा २४.१० टक्के तर येलदरी प्रकल्पातील पाणीसाठी ४१.४६ टक्के (Marathwada Water Storage) आहे. सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा ७८.२८ टक्के, माजलगाव धरणातील पाणीसाठ्याची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीला ३९.८० टक्के पाणीसाठा आहे, तर पैनगंगा प्रकल्पात ६६.५१ टक्के पाणीसाठा आहे.

उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता

मानार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय. तर निम्न तेरणा प्रकल्पामध्ये ३४.०९ टक्के पाणीसाठा (Jayakwadi dam Water Storage) आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ८६.५३ टक्के पाणीसाठा आहे, तर सीना कोळेगाव प्रकल्पात ९.७ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता (Rain Alert To Marathwada) हवामान विभागाने वर्तवविलीय. त्यामुळे धरण क्षेत्रात पुन्हा पाऊस झाल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यंदा मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT