दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असली, तरी या आपत्तीला संधी मानणाऱ्यांची कमी नाही...दुष्काळातला पाण्याचा प्रश्न दूर करण्याऐवजी मराठवाड्यात टँकरचा वेगळाच खेळ सुरू असल्याचं समोर आलंय..नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीलाच मराठवाड्यात तब्बल 706 टँकर सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात शेकडो टँकरद्रारे पाणीपुरवठा केला जात असताना, जिथे पावसाचे प्रमाण सर्वात कमी आहे त्या लातूरमध्ये मात्र एकही टँकर सुरू नाही..हे नेमकं काय गौडबंगाल आहे ते पाहूया ..शासकीय पर्जन्यमान अहवाल आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या टँकरची संख्या यातून हा विरोधाभास कसा उघडकीस आलाय. पाहूयात.
14 सप्टेंबर 2026 च्या पर्जन्यमान अहवालानुसार, लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 40.21 टक्के म्हणजे सर्वात कमी पाऊस पडला. तिथे अजून टँकर सुरु नाहीये..याउलट धाराशिवमध्ये 45.32 टक्के पाऊस पडला असून तिथे 27 टँकर सुरु आहे. बीडमध्ये 48. 04 टक्के पाऊस असताना तिथे तब्बल 365 टँकरने पाणी पुरवलं जातयं. त्याउलट छत्रपती संभाजीनगरमध्ये 65.44 टक्के पाऊस पडूनही तिथे 198 टँकर आणि जालना जिल्ह्यात 64.41 टक्के पाऊस पडूनही 117 टँकरने पाणी पुरवलं जातयं.
म्हणजेच जिथे कमी पाऊस तिथे टँकर सेवा नाही. त्याउलट बीडच्या माजलगाव धरणामुळे काही अंशी पाण्याचा प्रश्न सुटलेला असताना तिथे सर्वाधिक टँकर पुरवले जातायत..तर पैठणमधील जायकवाडी धरण पूर्णपणे भरलेलं असताना आणि कालव्यातून शेती आणि पिण्यासाठी 5 आवर्तनं दिली जात असतानाही संभाजीनगरमध्ये 198 टँकर रस्त्यावर धावत आहेत.
पाणीटंचाईच्या नावाखाली सुरु असलेल्या टँकरच्या गोरखधंद्याचं आर्थिक गणित आता मी तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका किलोमीटरला वाहतूक खर्च म्हणून 3 रुपये 40 पैसे शासनाकडून दिले जातात. टँकरमधील पाणी हे मेट्रिक टनात मोजलं जातं. एका टँकरमध्ये जवळपास 10 ते 12 मेट्रिक टन पाणी बसत आणि एका मेट्रिक टनामागे खाजगी टंकर चालकाला 171 रुपये दिले जातात.
म्हणजेच दहा किलोमीटर परिघात टँकरने पुरवठा करायचा झाल्यास, एक टँकर पाण्याची फेरी ही जवळपास 2500 हजाराला पडते. त्यात कागदावर बऱ्याचदा टँकर चालक दिवसातून 5-10 फेऱ्या दाखवतात. म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये 198 टँकरनं पाणीपुरवठा केला जात असताना एका फेरीचा 5 लाखांपर्यंत खर्च येतो..म्हणजे अशा 10 फेऱ्यांचा खर्च लाखोंच्या घरात आहे.
ही तफावत दिसत असली तरी प्रशासन मात्र पाणीपुरवठा योग्य पध्दतीने सुरू असल्याचा दावा करत आहे. दरम्यान कागदावर दाखवलेल्या फेऱ्या खरोखरच प्रत्यक्षातही होतात का? टँकर चालक ज्या गावाची नोंद करतो , तिथे खरोखर पाणी पोहोचत का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची वेळ आलीय...विशेष म्हणजे या प्रक्रियेत तालुक्यातील स्थानिक नेते, त्यांचे कार्यकर्तेच सक्रिय असतात अशी चर्चा आहे.
दरम्यान ग्रामीण भागातील जलस्रोतांमधून सुरू असलेल्या अनधिकृत उपसाकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होत असल्यानं उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने संपत चाललाय.. अशातच उन्हाळा लागण्यापूर्वी कृत्रिम पाणीटंचाईचं चित्र निर्माण करून सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये लाटण्याचा हा प्रकार आहे. आता या संपूर्ण 706 टँकर्सच्या फेऱ्यांची आणि देयकांची उच्चस्तरीय चौकशी होणार का, हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.