Marathwada Liberation Day Saam Tv
महाराष्ट्र

Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; मराठवाड्यासाठी विविध घोषणा

शिवसेना भाजपा युतीचं सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडिया

औरंगाबाद - आज मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या.  यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, तसंच केंद्रीय मंत्री भागवत कराडही उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी आणि ऐतिहासिक दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाला. आजच्या पिढीला या लढ्याची माहिती देण काळाची गरज आहे. या कार्यक्रमानंतर मी हैदराबाद येथे जाणार आहे. तिथे देखील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांचा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे, मरठवाडा विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी नियमित आढावा घेतला जाईल असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा

घृणेश्वर मंदिराच्या विकासासाठी 136 कोटी

पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार

जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार

पश्चिम मधील‌ नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रकल्प

जालना पाणीपुरवठा नूतनीकरण करणार

नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार

लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद

मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता

शिवाजी महाराज संग्रहालयाचे नूतनीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT