Golden-colored cotton grown by a progressive farmer in Marathwada, fetching premium prices in the market. saam tv
महाराष्ट्र

मराठवाड्यातील बळीराजाची कमाल, शेतात पिकवला 'सोनेरी' कापूस; रंगीत कापसाला 10 टक्के अधिक दर

Golden Cotton Cultivation Big Profit: पांढर सोनं म्हणून कापसाच्या शेतीला शेतकरी पसंती देतात. पण आता काही ठिकाणी चक्क सोनेरी कापसाचं उत्पादन घेऊन शेतकरी फायदा मिळवत आहेत. नेमका हा प्रयोग कुठे झालाय? त्याचं अर्थकारण कसं आहे ? पाहूया एक खास रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • मराठवाड्यात सोनेरी रंगाच्या कापसाची यशस्वी लागवड.

  • पारंपरिक पांढऱ्या कापसापेक्षा १०% अधिक बाजारभाव.

  • प्रयोगशील शेतकऱ्यांचा नवा प्रयोग चर्चेत.

खानदेश, मराठवाडा, विदर्भात शेतक-यांचा कापूस लागवडीकडे कल असतो. नगदी पिक असल्याने पांढ-या सोन्याच्या शेतीला बळीराजा पसंती देतो. त्यातून त्याला मोठा आर्थिक आधार मिळतो. पण मराठवाड्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत चक्क सोनेरी रंगाच्या कापसाचं उत्पादन घेतलंय.

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांतील 5 तालुक्यात हा प्रयोग झालाय. सुमारे 100 एकरवर बीटी-746 या वाणाची लागवड करण्यात आली. हा कापूस साध्या कापसापेक्षा वेचणीला सोपा आहे. या वाणाची रोगप्रतिकारकशक्तीही तुलनेत चांगली आहे. उत्पन्नही अधिक आहे. सुमारे 16 गावांमध्ये दीडशे शेतकऱ्यांनी या कापसाचं उत्पादन घेतलंय. सुमारे 500 क्विंटल सोनेरी कापसाची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे सोनेरी कापसाला 10 टक्के अधिक दर मिळतोय. दुधना हायटेक कृषी प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोनेरी रंगाच्या कापूस उत्पादनासाठी पुढाकार घेतला आहे.

शेतकऱ्यांनी यंदा सुमारे 20 गुंठ्यांपासून तब्बल चार एकरावर सोनेरी कापसाची लागवड केली. प्रचलित कापूस लागवडी प्रमाणेच लागवड करत खत, कीटकनाशकांचे व्यवस्थापन ठेवलं. यात शेतकऱ्यांना 5 क्विंटल ते 15 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळालंय. गतवर्षी प्रयोग म्हणून चार एकरांवर नैसर्गिक सोनेरी रंगाचा कापूस लागवड करण्यात आली होती. आता हेच क्षेत्र 100 एकरपर्यंत वाढलंय. गुणवत्ता आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात सोनेरी कापसाचे क्षेत्र वाढणार आहे.आणि त्यातून बळीराजालाही सोन्याचे दिवस येणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लग्नातील डीजे बंद केल्याच्या वादातून औरंगपुरात तुफान राडा

Drishyam 3 : अखेर २ ऑक्टोबरचं रहस्य २१ मे ला उलगडणार; 'दृश्यम ३' येतोय, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला धमाकेदार सुरूवात

Mango Eating Tips: जेवल्यानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Gavhachi Khichdi Recipe: जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पौष्टीक खायचंय? बनवा गरमागरम गव्हाची खिचडी, वाचा रेसिपी

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली अन् पुढच्या मिनिटाला ३ मोठ्या निर्णयांवर सह्या, थलपती विजय ठरले 'नायक'

SCROLL FOR NEXT