Marathi News Live
Marathi News Live - Saam Tv
महाराष्ट्र

Live Marathi News: मनसे आगामी काळात सामर्थ्यानं लढेल: राज ठाकरे

साम टिव्ही ब्युरो

मनसेचा १६वा वर्धापन दिन: राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

(प्राची कुलकर्णी)

राज ठाकरे-

-आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होतात. त्याबद्दल शुभेच्छा देतो

-आगामी काळात मनसे जोरदार लढेल अशी मी खात्री देतो

-बऱ्याच लॅाकडाउन बिकडाऊन सगळं झालं

-कोणी विचार केला नसेल असे दिवस पाहू

-स्वत:ला स्पर्श करायलाही भिती वाटत होती

-घरातल्यांचा ग्लास उचलायलाही भिती वाटत होती

-इतकी शांतता मी कधीच अनुभवली नव्हती

-फक्त पक्षांचे आवाज होते - मला कधी कधी वाटतं नरेन्द्र मोदींना कळवावे महिन्यातुन एक दोन दिवस लॅाकडाऊन करा

-कोकीळा पण कोव्हीड कोव्हीड ओरडत होत्या का

- या काळात कुटुंब जवळ आली

-माझ्यावरती आपल्या पक्षावर संकट आली

- येताना हातात हात घालून धुमाकूळ घालत येतात.. जाताना एकएकटी जातात

- हे प्रसंग येतात यात डगमगून न जाता

- जगातल्या प्रत्येकाला वाईट दिवस आले

- एकच व्यक्ती त्याने वाईट दिवस नाही पाहिला- त्या म्हणजे लता दिदी

ते परवा आमचे राज्यपाल - समज बिमज काही आहे का?

मला वाटलं शेकहॅंड केल्यावर हात बघायला लागतील- पण सुरु केलं, "आपका मंगल यहा पे है"

आपल्याला काही कळतं का शिवाजी महाराज वगैरे

शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ते माझ्या घरात लावलंय मी ..

मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाहीये- खरं कारण ते आहे

सरकार हातामध्ये- प्रशासक हातामध्ये

बाळा नांदगावकर-

१६ व वर्ष विरोधकांसाठी धोक्याच, मनसे चे मोक्याच

अमित ठाकरे यांच्यासाठी येणारा काळ हा सुवर्ण काळ असेल

आता नुसतं लढायच नाही आता जिंकायचं

कोरोना काळात मनसे चा कार्यकर्ता लोकांसाठी दिवस रात्र झटत होता

आमच्याकडे आमदार, खासदार नसले तरी आमच्याकडे ते बनवणारे निर्माते आहेत

मनसे प्रमुख राज ठाकरे गणेश कला रंगमंदिरात दाखल

(रश्मी पुराणिक)

मनसे प्रमुख राज ठाकरे गणेश कला रंगमंदिरात दाखल

काहीच वेळात होणार भाषणाला सुरुवात

मनसे च्या १६ व्या वर्धापन दिनाला पुण्यात मोठी गर्दी

अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे सह राज्यभरातून मनसे पदाधिकारी हजर

आमदार प्रसाद लाड यांना न्यायालयाचा दिलासा

(सुरज सावंत

भाजप नेते प्रसाद लाड याना मुंबई उच्च न्यायालयाने दिला दिलासा...मुंबई पोलिसांकडून होऊ शकणाऱ्या कारवाईला पुढील सुनावणी पर्यंत उच्च न्यायालयाने दिला दिलासा

- भाजपा आमदार प्रसाद लाड यांना कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

- प्रसाद लाड यांच्यावर 3 आठवड्यांसाठी  कोणतीही कारवाई न करण्याचे न्यायालयाचे आदेश

- प्रसाद लाड यांनी २००९ साली मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

जाणून घ्या ताज्या घडामोडी Saam TV Digitalच्या Live Updates च्या माध्यमातून...

मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्र्यांच्या भेटीला

(सूरज सावंत)

फडणवीस यांनी विधान भवनात केलेल्या आरोपानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला गेले आहेत. फडणवीस याच्या आरोपात संजय पांडे याच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पांडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारने विशेष जबाबदारी दिल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते पोलिसांच्या ताब्यात

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलं

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही

(भूषण शिंदे)

जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.

सरदार शहावली खाना जेल मध्ये आहे , सलीम आली पटेल यांनी दोघांनी मिळून हे षडयंत्र रकवडीमोलकावडी मोल भावात ही जमीन नवाब मलिक यांना विकली.

15 रुपये चौरस उत्तर किमतीने ही जमीन नवाब मलिक यांना विकली.

ज्यांचेस्फ़ोट मध्ये गेले नाही कुटुंबियांच्या आक्रोश तुमच्या कानी का नाही पडला ??

त्याची मास्टरमाइंड होती हसीना पारकर. तिच्याकडे ही जमीन घेतली.

मला उद्धव जी ना विचारायचं आहे. ते राजीनामा घेणार का ??

कारण तुम्हाला एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना उत्तरलागणार आहे.

तेव्हा त्यांना काय सांगणार कि सत्तेसाठी नाही राजीनामा नाही घेतला ??

आमचे संबंध हे गुन्हेगारी सोबत नाही आणि काल फक्त एक बॉम्ब फोडला.

अजून असे अनेक बॉम्ब माझ्याजवळ आहेत, वेळ आली कि मी फोडणार आहे

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

(सूरज सावंत)

मुंबई उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीला आव्हान देणार्‍या या याचिका फेटाळून लावल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी दाखल केली होती. या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळून डिपाॅझिट जप्त करण्याचा आदेश दिला आहे.

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच

(सूरज सावंत)

अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच..

अनिल देशमुख यांच्या जामिनावर आज निर्णय नाहीच..

निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने मुंबई विशेष न्यायालयाने राखून ठेवला निर्णय...

अनिल देशमुख यांच्या जामिनावर मुंबईतील विशेष कोर्टने निर्णय पुढे ढकलला...

निर्णय लिहून पूर्ण न झाल्याने आज निर्णय देता येतं नाही-न्यायाधीश रोकडे ...

- 100 कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख आहेत आर्थर रोड कारागृहात

आज मुंबईतील विशेष न्यायालय अनिल देशमुख यांच्या जामिनावर निर्णय देणार होते...

पुणे पोलिस अधिकारी करणार गृहमंत्र्यांना ब्रिफिंग

देवेंद्र फडणवीस विधानसभा पेन ड्राईव्ह प्रकरण

पुण्याचे पोलिस अधिकारी मुंबईत दाखल

गिरीश महाजन प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांना ब्रिफ करण्यासाठी पुणे पोलीस अधिकारी मुंबईत दाखल

काल देवेंद्र फडणवीस यांनी केले होते गंभीर आरोप

तपास अधिकारी एसीपी सुषमा चव्हाण करणार गृहमंत्र्यांना ब्रिफिंग

 नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा मोर्चा

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले असून आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून मोर्चा काढण्यात येणार आहे.  दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. आझाद मैदानात भाजपचे कार्यकर्ते जमतील आणि त्यानंतर मंत्रालायाचे दिशेने कूच करतील. भाजपचे सर्व आमदार, मुंबईतील नगरसेवक, खासदार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

मनसेचा प्रथमच वर्धापनदिन पुण्यात

- मनसेचा प्रथमच पुण्यात वर्धापनदिन

- 16 वा वर्धापनदिन गणेश कला क्रिडा रंगमंच येथे होणार 

- आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चेबांधणी

दरवर्षी मुंबईत होणारा मनसे चा वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच होत आहे. अर्थात आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वर्धापनदिनाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. शहरातील मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. राज्याच्या विविध भागातून मनसैनिक हजर राहणार आहेत. मेळाव्यात राज ठाकरे  नक्की काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

पक्ष तुमच्या पाठीशी उभा, राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

- काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संजय राऊत याना पत्र काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी उभा...

- केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने टार्गेट करत आहे...

- यातून मोदी सरकार विरोधकांना गप्प करत असल्याचे स्पष्ट होते...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

SCROLL FOR NEXT