Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, बारामती-राहुरी पोटनिवडणूक अपडेट, सुनेत्रा पवार, अक्षय कर्डिले, राज्यातील राजकिय, राज्यासह देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी जाणून घ्या....

Priya More

चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड मध्ये संध्याकाळच्या सुमारास धाडसी घरफोडीची घटना घडली आहे.गंगाधर विठ्ठोबा पवार यांची पत्नी कल्पना या कामानिमित्त दुपारी चांदवड येथे आल्या असता सायंकाळी साडेचारच्या ते पाच वाजेच्या सुमारास घरी परतल्यावर घराचे कुलूप तोडलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटाचे लॉकही तोडण्यात आले असल्याचे आढळून आले. पवार यांच्या मुलीचे लग्न येत्या 30 एप्रिल रोजी असल्याने साखरपुड्यात मिळालेले तसेच लग्नासाठी घेतलेले सोन्याचे दागिने—नेकलेस, पोत, लॉकेट, अंगठी, कानातले व एक बिस्कीट असे एकूण अंदाजे 20 तोळे सोनं काही रक्कम चोरीस गेले आहे.दरम्यान घटनेची माहिती चांदवड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर चोरीचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉड पथकाला पाचारण करण्यात आले होते.मुलीच्या लग्नासाठी आणलेले सोन गेल्याने कुटूंबासह संपुर्ण नातेवाईक,मित्र परिवार गावकरी पवार कुटूंबाच्या घरी जमा झाले होते,दरम्यान चांदवड पोलिस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा अधिक तपास करीत आहे.

नगर-पुणे महामार्गावर दारूच्या ट्रकचा थरारक अपघात

चासच्या घाटात दारूच्या बाटल्यांचा खच, चालक गंभीर जखमी.

दारूची वाहतूक करणारा एक आयशर ट्रक चास कामगारगावच्या अवघड घाटात झाला पलटी.

हा ट्रक नगरकडून पुण्याच्या दिशेने दारूचा साठा घेऊन जात होता एका अवघड वळणावर झाला ट्रक पलटी.

अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी.

वाशिम मनसेची समृद्धी महामार्गावर आपात्कालीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारहाण

  • एम एस आर डी सीचे अधिकारी आणि पोलिसासमोर केली मारहाण

  • दहा दिवसांपूर्वी आपत्कालीन सेवा देणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे एका जणांचा गेला होता जीव

  • मनसे,एम एस आर डी सी चे अधिकारी आणि कंत्राटदार यांची बैठक सुरू असताना कंत्राट दराने अरेरावीची भाषा केल्याचा मनसेचा आरोप

  • आपत्कालीन चे काम करणाऱ्या कंत्राटदारावर पदाचा गुन्हा दाखल करावा अशी मनसेची मागणी

मुंबईतील जमनाबाई नरसी शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

पिया, प्रिशा आणि वियान वालिया या भावंडांनी २०२५-२६ मध्ये एकूण ६३ पदके (३१ सुवर्ण, २० रौप्य, १२ कांस्य) जिंकत ‘सिब्लिंग्स ट्रायो’ म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली.

सिद्धकला तायक्वांदो अकॅडमीतील प्रशिक्षण आणि प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनामुळे ही कामगिरी शक्य झाली असून शाळेचे ट्रस्टी सुजय जयराज व मुख्याधपिका सोनल गांधी ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

निर्यात ठप्प! मासळीचे दर निम्म्यावर, रत्नागिरीत मच्छीमार संकटात

कोकण किनारपट्टीवर सध्या सुरू असलेल्या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम मत्स्यव्यवसायावर दिसून येत आहे.

डिझेलचे वाढते दर, गॅसची टंचाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने मासळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

परिणामी, मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

  • एसआयटीच्या पथकाकडून पुन्हा एकदा तपासणी सुरू

  • उद्या भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी संपणार असून कोर्टात केले जाणार हजर

  • कोर्टात हजर करण्यापूर्वी भोंदू अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटी चे पथक

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिराच्या भव्य सभामंडप उभारणीचे काम व परिसर विकास कामे वेगाने सुरू

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेवून मंदिर व परिसराचे कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल २०२६ रोजीपासून पुढे ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

  • वन विभागाची कारवाई, 6 आरोपी ताब्यात

  • आरोपींकडून बिबट्यांची कातडी जप्त

  • 29 मार्च 2026 रोजी वनगुन्हा दाखल

  • आरोपींनी 3 बिबट्यांची शिकार केल्याची कबुली

  • बिबट्यांचे दात व अवयव काढून घेतल्याची माहिती

उल्हासनगरच्या राधाबाई चौकात दुचाकीची धडक,  चिमुकली जखमी

  • उल्हासनगर कॅम्प ३ मधील राधाबाई चौकात दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला धडक दिल्याची घटना घडली आहे.

  • या अपघातात चिमुकलीच्या पायाला दुखापत झाली असून तिला तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

  • संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

  • पुणे शहरातून ड्रग्स जोपर्यंत हद्द हद्दपार होणार नाही तोपर्यंत पुणे पोलीस शांत बसणार नाहीत

  • पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची तंबी

  • शहरात ड्रग्स विक्री करणाऱ्या वर मकोका अंतर्गत कारवाई करणार

  • शहराध्यक्ष विक्री करणाऱ्यासह जे ड्रग्स खरेदी करतील किंवा ड्रग्स सेवन करतील त्यांच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार

  • ड्रग्स विक्री करणाऱ्यांना आणि सेवन करणाऱ्यांना सक्त ताकीद आहे की योग्य वेळी मार्गावर या या गुन्ह्यात दिसला तर तुमच्या पूर्ण पिढीला लक्षात राहील अशी कारवाई करू

पुण्यात भाजपचा ४६ वा वर्धापनदिन कार्यक्रम

पुण्यात भाजपचा ४६ वा वर्धापनदिन कार्यक्रम

सक्रिय कार्यकर्ता मेळावा

शिवप्रकाश,राष्ट्रीय सह संघटन मंत्री भाजप,प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण,मंत्री चंद्रकात पाटील,मंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे

पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे होत आहे कार्यक्रम

शेतकी संघाचा ‘भोंगळ’ कारभार : पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज !

जळगाव एकीकडे जग डिजिटल युगात प्रगती करत असताना, दुसरीकडे भडगाव तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना आपले धान्य विकण्यासाठी भीषण संघर्ष करावा लागत आहे.

भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ कारभारामुळे ज्वारी खरेदीचे टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गेल्या रांगा लावाव्या लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

सोनू कल्याणकर खून प्रकरणातील तीन आरोपींना दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी.

नांदेड शहरातील श्रीनगर भागात काल सकाळी सोनु कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत पाच जणांना अटक केली.

त्यापैकी चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने तीन आरोपींना दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी सुनावली.

माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग

माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग..

रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला आग लागली की, लावली गेली ?

मनसे कामगार सेना चिटणीस अनिश खंडागळे यांचा आरोप.

पुण्यातील कोपा मॉल उडवून देण्याची धमकी

पुण्यातील मुंढवा भागात असलेल्या कोपा मॉल च्या प्रशासनाला धमकी

कोपा मॉलच्या व्यवस्थापकीय ईमेल आय डी वर आला धमकीचा मेल

या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हा प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजून २१ मिन दरम्यान घडला

याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे

बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं प्रफुल पटेलांनी घेतलं चांदपूरच्या प्रसिद्ध हनुमानजींचं दर्शन

कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असल्यास मी भंडाऱ्याच्या प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमानजींच्या दर्शनाला येतो. मागील ३० ते ३५ वर्षांपासून मी या देवस्थानात नतमस्तक व्हायला येतो. इथं दर्शन घेऊन एक समाधान मिळतं. जेव्हा कुठलाही चांगलं काम करायचं असेल तर मी नक्की येतो यावेळी माझ्या जिल्ह्याच्या, माझ्या मतदारांच्या, माझ्या पक्षाच्या, कुटुंबाच्या आणि सर्वांचं भलं व्हाव यासाठी चांदपुर देवस्थानात दर्शनासाठी आल्याचं प्रफुल पटेलांनी सांगितलं. बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने प्रफुल पटेल यांच श्रद्धास्थान असलेल्या चांदपूर येथील देवस्थानाच दर्शन आणि यापूर्वीचा प्रफुल पटेलांना प्रत्येक निवडणुकीत आलेला अनुभव यामुळे या हनुमानजींच्या दर्शनाला एक वेगळं महत्व प्राप्त होत आहे.

pune : भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न 

वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती

काही वाहनांना धडक दिल्याची माहिती

उत्तमनगर पोलीस स्टेशन यांच्या सतर्कतेने मोटर चालकाला पकडण्यात यश

Buldhana : साध्वी सृष्टीलता रामायणीजींची बुलढाण्यात भव्य शोभायात्रा 

साध्वी सृष्टीलता रामायणीजींची बुलढाण्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

जैन समाजासह वारकरी संप्रदायाची उत्स्फूर्त उपस्थिती

भक्तीमय वातावरणात बुलढाणा दुमदुमले

महिलांचा तुळशी घडांसह सहभाग, टाळ-मृदूंगाच्या गजरात शोभायात्रा संपन्न

Panvel : पनवेल महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायत कर्मचारांच्या नियुक्तीमध्ये भ्रष्ट्राचाराचा आरोप; फेरतपासणी तपासणी करण्याची जनशक्ती पक्षाची मागणी

Kalyan : कल्याण ग्रामीणमध्ये गुरचरणाच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

कल्याण ग्रामीणमध्ये गुरचरणाच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण पाहायला मिळत आहे.

केडीएमसी कारवाई करीत नसल्याने आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचे पूजन करुन शेण खाऊ घातले

सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रभाग कार्यालयासमाेर आंदोलन

sangli : भाजपाकडून राजकीय द्वेषापोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन, न्यायालयामध्ये दाद मागणार; बाजार समिती संचालक मंडळांचा इशारा

भाजपकडून केवळ राजकीय द्वेषापोटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्त संचालकांकडून बाजार समिती विभाजनाचा निषेध नोंदवला. तसेच केवळ महाविकास आघाडीची सत्ता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर असल्याने भाजपने ही कारवाई केली आहे. या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून याप्रकरणी दादा मागणार,असल्याचे स्पष्ट केले आहे

Solapur : जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात तक्रार 

- वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल

- सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली.

- मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिलीय

- महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे चुकीचे वक्तव्य केले होते.

- त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने 6 दिवसापूर्वी निवेदन दिले होते.

- मात्र जैनमुनीविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यात आली

Nanded : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकल मातंग समाज आणि विविध संघटनांच्या वतीने या धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून मातंग समाजाचे अनेक नेते,कार्यकर्ते आणि विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

Nashik: शेतकऱ्यांच्या 7/12 वरील midc चा शेरा रद्द करावा यासाठी धरणे आंदोलन 

मनमाड शहरासाठी 2 वर्षा पूर्वी औदयोगिक वसाहतिची स्थापना झाली, शासनाची 350 एकर जागा असताना शहरालगत असलेल्या अनकवाडे व सटाणा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद करण्यात आल्या आणि त्यांच्या 7/12 उताऱ्यावर तशा नोंदी करण्यात आल्या

अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा ,क्लस्टर योजना तातडीने राबवा; कल्याणमध्ये आंदोलकांची मागणी

डोंबिवलीतील आयरे दत्तनगर येथे क्लस्टर योजना राबविली जात आहे. या याेजनेकरीता लाभार्थींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. योजना राबविण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेस आदेश दिले आहे की, योजनेकरीता विकासक नेमण्यात यावा.

अशोक खरातला कायद्यापुढे झुकावंच लागलं - तृप्ती देसाई

अनेक महिलांचे शोषण झाल्याची बाब गंभीर आहे. अशोक खरातने केलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे त्याला अटक झाली आहे. कायद्यापुढे त्याला झुकावंच लागलं आहे.

Nashik: नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती

नाशिकमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती

शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

आज राष्ट्रीय हरित लवादासमोर झालेल्या सुनावणीत निर्णय

तपोवनासह शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमींनी दाखल केली होती याचिका

याचिकेवरील सुनावणी दरम्यान २८ एप्रिलपर्यंत महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार

Raigad: रायगडच्या कोर्लाई गावात भिषण पाणी टंचाई

रायगडच्या कोर्लाई गावात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची हि समस्या जल जिवन योजना अशस्वी झाल्याने निर्माण झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. फणसाड धरणात पाणी आहे पण पाईप लाईन वारंवार फुटत असल्याने कोर्लाई गावात पाणी नाही. गेली दोन महिने गावात पाणी नसल्याने घरात वापरासाठी आणि पिण्यासाठी पाणी विकत आणण्याची वेळ कोर्लाई ग्रामस्थांवर आली असून योजनेचा ठेकेदार आणि शासनाविरोधात ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करीत आहेत.

Cotton:कापूस दरात मोठी उसळी, कापसाचे दर पोहोचले 8300 प्रति क्विंटल वर..

कापसाच्या दरात अचानक ७०० ते ८०० रुपयांची वाढ होत सध्या दर ८३०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा दर ७१ सेंट प्रति पाउंडपर्यंत गेल्याने ही वाढ झाली आहे.डॉलर मजबूत होणे आणि कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पॉलिस्टर महाग झाल्याने नैसर्गिक कापसाची मागणी वाढली आहे. तसेच सरकीच्या दरातही वाढ झाल्याने कापसाला चांगला उठाव मिळाला आहे.मात्र अमरावती जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कापूस ‘सीसीआय’ केंद्रांवर विकल्याने या दरवाढीचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

Thane: शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनी मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सदरची गळती तातडीने बंद करणे आवश्यक आहे. या कामासाठी शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा SIT पथकाच्या संपर्कात

भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा SIT पथकाच्या संपर्का

भोंदू अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीचीही आज चौकशी होणार असल्याची माहिती

अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस, उद्या खरातला न्यायालयात केले जाणार हजर

अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीची चौकशी होणार, मात्र पत्नी कल्पना अद्याप फरार

अशोक खरातची महिलाचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी SIT कडून चौकशीसह जाब जबाब नोंदवण्यात काम सुरू

आज सायंकाळी ५ SIT पत्रकार परिषद देखील घेणार

Pune: पुण्यात अनधिकृत ओव्हरहेड केबल टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

पुण्यात अनधिकृत ओव्हरहेड केबल टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

गायरोप केबल्स आणि विविध टेलिफोन कंपन्यांच्या केबल्स अनियमित पद्धतीने टाकल्यामुळे शहराचे सौंदर्य झाले बाधित

ओव्हरहेड केबलमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला

या कंपन्यांवर महानगरपालिका फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली

पुणे शहरातील आतापर्यंत शंभर किलोमीटरच्या केबल्स हटविण्यात आल्या

केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य

Ashok Kharat Case: अशोक खरातप्रकरणी आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता

दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती

एक डिसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती

आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का ?

खरात सोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का ? याबाबत तपास होण्याची शक्यता

Nanded: जिल्हा पुरवठा अधिकारी असलेल्या पती विरोधात पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचे उपोषण

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड विरोधात खुद त्यांच्या पत्नीने उपोषण सुरु केले आहे. मानसिक त्रास देत असल्याचा आरोपावरून तसेच आर्थिक मदतीच्या भरण्याच्या मागणीसाठी पत्नी दैवशाला यांनी आपल्या दोन लहान मुलासह उपोषण सुरु केले आहे. मागील अनेक वर्षा पासून पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी असलेले जगदीश बारदेवाड हे दोन वर्षा पासून पत्नी आणि मुलांना उघड्यावर सोडून वेगळे राहत आहे.असा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळले. एका मोठ्या अधिकाऱ्या विरोधात त्यांच्या पत्नीने उपोषण सुरु केल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.

Nashik: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूज आणि भाजीपाल्याच्या दरात घसरण

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूज आणि भाजीपाल्याच्या दरात घसरण

टरबूज, वांगी कोबी,फ्लावर या भाजीपाल्याचे दर घसरले

वांग्याला किलोला अवघे 2 रुपयांचा बाजार भाव मिळाला

टरबूजला 4 ते 5 रुपये इतका किलोला दर मिळाला

तर कोबीच्या एक गड्ड्याला चार ते पाच रुपयाचा दर मिळाला

मेथीला 1 ते 5 रुपयांचा दर मिळाला

Pune: पुण्यातील भोरमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन, 300 हून अधिक बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग

पुणे -

पुण्याच्या भोर तालुक्यातील नीलकंठ गावात ग्रामदैवत काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त, काळुबाई केसरी भव्य बैलगाडा शर्यतींच करण्यात आलं होत आयोजन

शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 300 हून अधिक बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग

ग्रामदैवत काळूबाई यात्रा उत्सवा निमित्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शर्यतीच करण्यात आलं होत आयोजन

शर्यतींचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा प्रेमींनी केली होती गर्दी

यावेळी विजेत्या बैलगाडा मालकांना ढालीसह लाखो रुपयांची देण्यात आली बक्षीसं

Ratnagiri: रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात द्राक्षांची आरास

रत्नागिरी -

रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात द्राक्षांची आरास

आकर्षक द्राक्षांची आरास अनेकांचं वेधून घेतेय लक्ष

सांगलीतील एका शेतक-यांनं दिली ही द्राक्ष

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतक-याने दिली आरास करण्यासाठी द्राक्ष

ही द्राक्ष प्रसाद म्हणून भाविकांना दिली जाणार

Solapur: वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात तक्रार दाखल

सोलापूर -

- वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल

- सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली.

- मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिलीय

- महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे चुकीचे वक्तव्य केले होते.

- त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने 6 दिवसापूर्वी निवेदन दिले होते.

- मात्र जैनमुनीविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यात आली

Nashik: नाशिकमधील वृक्षतोडी प्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी

नाशिक -

- नाशिकमधील वृक्षतोडी प्रकरणी आज राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी

- महापालिकेने वृक्षतोड करू नये यासाठी पर्यावरण प्रेमींनी दाखल केलीय याचिका

- नाशिकमधील तपोवनापाठोपाठ गंगापूर रोड परिसरात देखील रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड

- वृक्षतोडीवरून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आले होते आमने-सामने

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनासह शहरातील अन्य भागात केली जातेय वृक्षतोड

- आजच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या सुनावणीत काय निर्णय होतो? याकडे सर्वांचं लक्ष

Pune: राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान, 2 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

पुणे -

राज्याला अवकाळी पावसाने मोठे नुकसान

दोन लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील पिके बाधित

दोन महिन्यात झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहेत

मार्च महिन्यात १ लाख २३ हजार हेक्टर तर एप्रिलमध्ये ८२ हजार ९३० हेक्टर वरील पिकांचा समावेश

राज्यात 12 मार्चपासून अवकाळी पाऊस आला सुरुवात झाली आणि 29 जिल्ह्यातील पिकांना फटका बसला

एप्रिल मध्येही अवकाळी पावसामुळे पाच दिवसात 17 जिल्ह्यातील पिकाचे नुकसान झाल्याचे समोर

Pune: सखल भागात पाणी तुंबू देऊ नका, पुणे महापालिकेचे सभागृहनेते बिडकर यांचे आदेश

पुणे -

सखल भागात पाणी तुंबू देऊ नका, पुणे महापालिकेचे सभागृहनेते बिडकर यांचे आदेश

शहरात कमी कालावधीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत आहेत

या पार्श्वभूमीवर, सखल भागांतील आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी सूचना

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Pune: राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांचा समावेश

पुणे -

राज्य सरकारच्या प्रस्तावित कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांचा समावेश

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदाराबाबतची माहिती ऑनलाईन पोर्टलवर वर संकलित

थकीत कर्जदार व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे

राज्य सरकारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना साठी हे शेतकरी पात्र असणार आहेत

Nagpur: नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस असणार बंद

नागपूर -

- नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म क्रमांक 2 पुढील 52 दिवस असणार बंद

- नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी मध्य रेल्वेने घेतला निर्णय

- 8 एप्रिल 2026 पासून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तब्बल 52 दिवसांसाठी बंद राहणार आहे

- प्लॅटफॉर्म क्रमांक दोन बंद असणार असल्याने या काळात काही गाड्यांच्या मार्गात बदल तर काही गाड्यांना अजनी येथे थांबा देण्यात आलेला आहे

Nashik: नाशिक पोलिसांनी गॅस चोरी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश

नाशिक -

- नाशिकमध्ये गॅस चोरीचा मोठा भांडाफोड, पोलिसांनी केला गॅस चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

- घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस चोरीचा पर्दाफाश

- शहरातील भद्रकाली बाजार परिसरात पोलिसांचा छापा

- घरगुती गॅस सिलिंडरमधून LPG गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरला जात असल्याचा प्रकार उघड

- याप्रकरणी ४ जणांना अटक तर १ आरोपी फरार

Nashik: भोंदू अशोक खरातच्या मुलीची आज SIT चौकशी होणार, सूत्रांची माहिती

नाशिक -

- भोंदू अशोक खरातच्या मुलीची आज SIT चौकशी होणार, सूत्रांची माहिती

- अशोक खरातची मुलगी तृप्ताबालाची आज SIT चौकशी होणार, सूत्रांची माहिती

- मुलगी तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर

- खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आज मुलीची चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती

- तर लवकरच दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती

Pune: बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल

पुणे -

बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले

बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांची माहिती

मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत

बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या निवडणुकीत ५५ अर्ज दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT