Maharashtra Live News Update  Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: राहत्या घराला भीषण आग; सोन्या- चांदीचे दागिने जळून खाक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २ मार्च २०२६, इराण-इस्त्राइल युद्ध, पाकिस्तान-अफगाणिस्तान हल्ला, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Nashik : नाशिकच्या कळवणमधील आदिवासी बांधवांची पारंपारिक होळी दहन

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा,पेठ, कळवणच्या आदिवासी भागात होळी सण पारंपारीक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. होळी सण आदिवासी भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळी सणासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी मजूर,नोकरदार होळी सणासाठी गावी येत असतात. विशेष म्हणजे लहाना पासून आबालवृद्ध नवीन कपडे परिधान करण्याची परंपरा आजही आदिवासी बांधव जपत आहे.

Sangli : राहत्या घराला भीषण आग; सोन्या- चांदीचे दागिने जळून खाक

सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या इटकरे येथे राहत्या घराला भीषण आग लागली आहे.ज्यामध्ये सुमारे नऊ लाखांचं नुकसान झालं आहे. इटकरे येथील माने बंधूंच्या घराला ही आग लागली आहे. ज्यामध्ये दोन्ही भावांचे घर जळून खाक झाली आहेत. या आगीमध्ये साडेसात लाखांच्या रोकड आणि सोन्या चांदीचे दागिनेही जळाले आहेत.

pandharpur : पंढरपुरात पारंपारिक पद्धतीने विठ्ठल मंदिरासमोर होळी पूजन

पंढरपुरात आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होलीका पूजन करण्यात आले. रुक्मिणी पटांगण येथे उत्पात समाजाच्या वतीने रुक्मिणी मातेची पारंपारिक होळी संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने हरिनामाचा जयघोष करत होलिका पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली.

Solapur : काँग्रेसने जाळली महागाईच्या भस्मासुराची होळी

सोलापुरात काँग्रेसने जाळली महागाईच्या भस्मासुराची होळी

भाजपचा निषेध व्यक्त करत सोलापुरात काँग्रेसतर्फे अनोख्या पद्धतीने होळी साजरी

अमेरिका आणि भारत व्यापारी कराराच्या देखील यावेळी करण्यात आला निषेध

मोदी सरकाराच्या नावाने बोंबा मारत यावेळी शिमगा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला

मुंबईतील सराफा दुकानात मोठी घरफोडी 

एम.एच.बी. पोलीस ठाणे हद्दीत सराफा दुकानात मोठी घरफोडी

▪️ १३ जानेवारी २०२६ रात्री ते १४ जानेवारी पहाटेदरम्यान घटना

▪️ शटर उचकटून तिजोरी फोडत सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Malegaon : खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मशिदीवर लावले काळे झेंडे 

जगात अमेरिका-इस्त्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू असून या युद्धात इराणचे नेते खोमेनेई यांचा मृत्यू झाल्याने जगासहित भारतात पडसाद उमटू लागल्याचे दिसत आहे. नाशिकच्या मालेगावातील हुसेनी मशिदीवर खोमेनेई यांचे बॅनर लावण्यात आले. मशिदीवर काळे झेंडे लावून त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

अमरावतीमधील एका गावात ७५ वर्षापासून साजरी होत नाही होळी

रंगोत्सव खेळला जात नाही, शिवाय पुरणपोळी सारखे गोडधोड पदार्थही केले जात नाहीत..

कारण पिंपळद गावचं आराध्य दैवत परमहंस संत परसराम महाराज याचं या दिवशी देहावसन झालं, त्या दिवसापासून या गावात होळी, रंगोत्सव साजरा केला जात नाही..

दुबईमध्ये अडकलेल्या धुळ्यातील नागरिकांना मंत्री गिरीश महाजनांचा फोन, परिस्थितीची घेतली माहिती

दुबईमध्ये अडकलेल्या धुळ्यातील नागरिकांशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन द्वारे संवाद साधून तिथल्या परिस्थितीची घेतली माहिती

दुबईमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना होत असलेल्या अडचणींबाबत गिरीश महाजन यांनी घेतली माहिती

अनेक मोठ्या हॉटेलमध्ये अडचणी निर्माण होत असल्याने हॉटेलमध्ये थांबलेल्या नागरिकांना हॉटेल सोडण्याबाबत सांगितलं जात असल्याने थांबायचं तरी कुठे असा नागरिकांसमोर प्रश्न

तणावाची परिस्थिती असल्याने विमान वाहतूक बंद मात्र राज्य सरकार व केंद्र सरकार हे नागरिकांच्या सोबत असल्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना दिले आश्वासन

मुख्यमंत्री फडणवीस एसबीएल कंपनीतील स्फोटात जखमींची घेणार भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे भेट देतील

काल काटोल तालुक्यातील राऊळ गाव परिसरातील एसबीएल कंपनी झालेल्या स्फोटात जखमीं झालेल्या रुग्णाची रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची संदर्भात विचारपूस करतील.

अतिक्रमण हटाव मोहिमेवरून रणकंदन; MIMसह विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर येथे अतिक्रमण हटाव मोहिमेवरून रणकंदन सुरू आहे. महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांसह MIMच्या १४ नगरसेवकांवर अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आलेत.

कल्याण आधारवाडी जेलमधील २ लाचखोर जेल कर्मचाऱ्यांना बेड्या

शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी दोन लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे

कारागृहात कैद्याची भेट घडवून आणण्यासाठी नातेवाईकांकडे केली होती लाचेची मागणी

अँटी करप्शन विभागाने सापळा रचत केले रंगेहाथ अटक

त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविकांना मारहाण प्रकरण,जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरातील भाविकांना मारहाण प्रकरण

जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

प्रांत अधिकाऱ्यांकडून संपूर्ण घटनेची चौकशी होणार

घटनेचे व्हिडिओ, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडीओ तपासले जाणार

चौकशीनंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार

धूलिवंदनला पुण्यात मेट्रोची सेवा दुपारी 3 पर्यंत राहणार बंद

पुणे, ता. २ ; धूलीवंदन सणानिमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवा मंगळवारी (ता. ३) सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत बंद असणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू असेल,असे महामेट्रो ने कळविले आहे.

अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा ते चांदुर रेल्वे दरम्यान आमला विश्वेश्वर जवळ पिकअप वाहनाला अपघात....

रस्त्याचे काम सुरू असल्याने वारंवार होता अपघात -अपघातात पाच मजूर जखमी...

रस्त्याचे काम संथ गतीने होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप...

रस्त्याच्या कामामुळे वाढले अपघात.

पालघर - भगेरिया केमिकल कंपनी दुर्घटना अपडेट

ओलियम गॅसच लिकेज प्रमाण काही प्रमाणात कमी झालं . तब्बल तीन तासानंतर ओलियम गॅसच्या साठ्यासाठी ठेवण्यात आलेल टॅंक मधील लिकेज कमी . अग्निशमन दलाला लिकेज गॅसवर नियंत्रण मिळवण्यात यश . एनडीआरएफ ची टीम देखील घटनास्थळी दाखल . सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची प्रशासनाची माहिती .

कोल्हापूरातील 100 हून अधिक पर्यटक दुबईत अडकले

सहल प्रमुख सतीश पोवार यांच्याकडून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे व्हिडीओ जारी

कोल्हापूरातील ट्रँव्हल एजन्सीचे सहल प्रमुख सतीश पोवार 50 पर्यटकांना घेवुन दुबई सहलीसाठी गेले आहेत

दरम्यान सर्व पर्यटक सुरक्षित असून मिरँकल गार्डन फिरत असल्याचं त्यांनी सांगितलंय

जळगाव शहरात धुलीवंदनाच्या सणानिमित्त बाजारपेठ सजली

धुलीवंदनाच्या सणानिमित्त जळगाव शहराची बाजारपेठ सजली असून बाजार शहरात विविध प्रकारचे आकर्षक रंग हे उपलब्ध झाले आहे यामध्ये स्प्रे कलर, कलर्स चे सिलेंडर, विविध कलर यावेळी उपलब्ध झाले आहे तसेच बच्चे कंपनीसाठी रंगीबिरंगी पिचकारी दाखल झाल्या आहेत

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यास मान्यता

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी दिली.

पुण्यात आज महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची बैठक झाली

या बैठकीत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उर्वरित बळकटीकरणासाठी आवश्यक खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली.

अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे विजय अग्रवाल

अकोला महापालिकेत महापौर-उपमहापौर पदानंतर भाजपने स्थायी समिती आणि इतर समित्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेय.‌ आज झालेल्या स्थायी समिती पदाच्या निवडणुकीत भाजपचे विजय अग्रवाल विजयी झालेत.‌ त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद फजलु पैलवान यांचा 9 विरुद्ध 6 मतांनी पराभव केलाय.‌ 16 सदस्यीय स्थायी समितीत भाजप आणि मित्र पक्षांचे 9 सदस्य आहेत. तर विरोधी पक्षांचे 7 सदस्य आहेत.‌

Jalna: जालन्याचे खासदार कल्याण काळे हे दुबईमध्ये अडकले

जालना -

जालन्याचे खासदार कल्याण काळे हे दुबईमध्ये अडकले

ते सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून कळतेय..

खासदार डॉ कल्याण काळे हे 27 फेब्रुवारी ला कुटुंबीयांसोबत दुबई ला गेले होते, दरम्यान ते सुरक्षित असल्याची माहिती त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिलीय..

दरम्यान जालना जिल्ह्यातील 8 जन दुबई मध्ये अडकल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे..

इराण अमेरिका इझ्रायल मधील युद्धपरिस्थिती मुळे विमान सेवा बंद झाल्याने हे सर्व जन अडकलेत..

Nashik: इराण युद्धाचा फटका नाशिकच्या कांद्याला, अनेक कंटेनर अडकून पडले

इराणमध्ये होत असलेल्या युद्धामुळे भारतातुन जाणाऱ्या विशेषतः नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या कांद्याला मोठा फटका बसला

त्यामुळे कांद्याचे अनेक कंटेनर अडकून पडले आहे

परिणामी त्याचा फटका आता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे

Navi Mumbai: दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत आडकला रायगडमधील उत्कर्ष मपारा

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत आडकला रायगडमधील उत्कर्ष मपारा

दुबईतील युद्धजन्य परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील पाली येथील उत्कर्ष मपारा हा विद्यार्थी आडकला आहे.

त्यांचे वडील राजेश मपारा यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्याशी संपर्क साधत परिस्थितीची चौकशी केली.

सध्या तरी तो राही असलेल्या ठिकाण सुरक्षित असल्याचे उत्कर्ष याने सांगितले असून त्याच्यासोबत दोनशे विद्यार्थी असल्याचे त्याने सांगितले आहे.

पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील दोन जोडपे अडकले

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबईला गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत

दुबईमध्ये सध्या निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. यामुळे यांना परतीचा प्रवास करता आलेला नाही

Nandurbar : प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राला घाणीचा विळखा; सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी स्वच्छतेची मागणी

प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्राच्या दीड एकर प्रशस्त आवारात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहादा-प्रकाशा मुख्य रस्त्यालगत असलेल्या या चौकीच्या दर्शनी भागात आणि मागील बाजूस सांडपाण्याचे डबके साचले असून,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. परिसरात काटेरी झुडपे वाढली असून, जप्त केलेली वाहने अस्ताव्यस्त पडल्याने शिस्तीचा अभाव दिसून येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणीसाठी लाखो भाविक येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर या परिसराची स्वच्छता करून संरक्षक भिंत बांधावी आणि वृक्षारोपण करून परिसर सुशोभित करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दुरवस्थेकडे लक्ष देऊन सुजलाम सुफलाम मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्हा परिषदेत भौतिक सुविधांचा अभाव

लातूर जिल्हा परिषद इमारतीत मूलभूत आणि भौतिक सुविधांचा अभाव असल्याची बाब समोर आली आहे. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, तसेच इमारतीतील लिफ्ट मागच्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत धुळकात पडली आहे, दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयात येणाऱ्या, वृद्ध नागरिक, अपंग व्यक्ती, यांच्यासह कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत दररोज विविध कामांसाठी शेकडो नागरिकांची ये-जा असते. मात्र लिफ्ट बंद असल्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि महिलांना जिन्याने वरच्या मजल्यावर जाणे भाग पडत आहे. त्यामुळे गैरसोय वाढली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिल्लीत शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

DHULE धुळ्यात पांझराकाठी रंगली 'कोरडी होळी'; रासायनिक रंगांना फाटा देत 'गुड मॉर्निंग ग्रुप'ने जपले पर्यावरणाचे भान

धुळ्यात रंगांच्या उत्सवाला सामाजिक भान आणि पर्यावरणाच्या रक्षणाची एक सुंदर किनार लाभली आहे, सहसा होळी म्हटलं की पाण्याचा बेसुमार वापर आणि रासायनिक रंगांची उधळण हे चित्र डोळ्यासमोर येते, मात्र, धुळ्यातील 'गुड मॉर्निंग ग्रुप'ने या प्रथेला छेद देत चक्क पांझरा नदीच्या काठी 'कोरडी होळी' साजरी करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे, वाढत्या पाणीटंचाईचे संकट ओळखून आणि त्वचेला घातक ठरणाऱ्या केमिकल्सना हद्दपार करत, अत्यंत साध्या पण तितक्याच उत्साहात साजरा झालेला हा अनोखा रंगोत्सव नक्कीच प्रेरणादायी आहे,

निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी केवळ चर्चा न करता 'गुड मॉर्निंग ग्रुप'ने यंदा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे, या ग्रुपने होळी खेळताना पाण्याचा एकही थेंब न वापरता आणि निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या रासायनिक रंगांना पूर्णपणे फाटा दिला आहे, केवळ परंपरेच्या नावाखाली होणारे प्रदूषण टाळत, अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा दिल्या, सण साजरा करताना पर्यावरणाचे भान कसे राखावे, याचा एक अत्यंत सकारात्मक आणि दिशादर्शक संदेश या 'कोरड्या होळी'च्या माध्यमातून संपूर्ण धुळे शहराला देण्यात आला आहे.

Maharashtra Live News Update : अमेरिका-इराण तणावातही सोमवारी सोने, चांदीच्या दरात चढ-उतार सुरू

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अमेरिका-इराण दरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सोन्याच्या दरात १२ हजार रुपयांपेक्षा अधिक, तर चांदीच्या दरात २३ हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली होती. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोना दारा 1000 ने कमी झाल्याने याकडे सर्वांचे लक्ष होते. प्रत्यक्षात, दोन्ही धातुंचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतर जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात डिजिटल रेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची अकरा कोटींची फसवणूक

पुण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाला सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल रेस्ट करण्यात येणार असल्याची भीती दाखवली आणि त्यांची पावणेअकरा कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एटीएम मधून पैसे काढल्यामुळे पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आल आहे.

पंढरपूर काॅरिडार विरोधात दुकानदारांचा मोर्चा

विठ्ठल रूक्मिणी मंदिर‌‌‌ परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या विरोधात आज बाधित दुकानदार आणि रहिवाशांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात कॅरिडाॅर रद्द करावा अशा घोषणा देण्यात आल्या.

येथील संत नामदेव पायरी पासून मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोड मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. त्यानंतर तहसीलदार सचिन लंगोटे यांना मोर्चेकर्यांनी निवेदन दिले. मोर्चात दुकानदार व रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इराणचा अमेरिकेवर पलटवार, 'कॅम्प ब्यूहरिंग' लक्ष्य | Iran Drone Attack | US Military Base Kuwait

 Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सत्ता स्थापनेची चर्चा शेवटच्या टप्प्यात

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सत्ता स्थापनेची चर्चा शेवटच्या टप्प्यात,मात्र शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा गट चर्चेपासून दूर

सलग दोन दिवस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीला भाजप आमदार पुत्र मल्हार पाटील

भेटीवेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तसेच बंडखोरी करत निवडून आलेले आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतही उपस्थित

तर दोन्ही बैठकावेळी आमदार तानाजी सावंत किंवा सावंत समर्थक विजयी उमेदवार हजर नाहीत

आमदार तानाजी सावंत यांना दूर ठेवत जिल्हा परिषद सत्ता स्थापनेची आखणी,चर्चेला उधाण

निवडणुकीपूर्वीही तानाजी सावंत यांनी महायुतीत न लढता स्वतंत्र निवडणुका लढल्या

धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा अध्यक्ष होणार,अध्यक्ष पदासाठी महायुतीकडे अपक्ष सदस्यांसह 36 संख्याबळ

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांचे नाव आघाडीवर

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमानातील दोन्ही वैमानिकांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जाणार

अजित पवारांच्या विमानातील दोन्ही वैमिनाकांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले जाणार

सी आय डी कडून दोन्ही वैमानिकांचे ट्रॅक रेकॉर्ड अभ्यासले जाणार

अजित पवारांच्या अपघाताचा सी आय डी कडून तपास सध्या सुरू

दोन्ही वैमानिकांचा मागील १ महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड तपासला जाणार

ऑन ड्युटी विमान उड्डाणं प्रक्रिया, दौरे, कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली जाणार

तसेच ऑफ ड्युटी असताना दैनंदिन घडामोडींचा सुद्धा सी आय डी करणार अभ्यास

PMC: पुणे महापालिकेत १ मार्चपासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

पुणे महापालिकेच्या प्रशासनातील पारदर्शकता, शिस्त व कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीद्वारेच दैनंदिन हजेरी नोंदवणे आता आवश्यक आहे. महापालिकेत काम करणाऱ्या सर्वांसाठी १ मार्चपासून बायोमेट्रिक हजेरी पुन्हा एकदा बंधनकारक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेत या मशीन बंद असल्यामुळे अनेक कर्मचारी यांचं "आओ जाओ घर तुम्हारा" कारभार "साम टिव्ही" ने समोर आणला होता. यानंतर पालिकेला जाग आल्यानंतर अखेर आता या बायोमेट्रिक कंपनीशी नव्याने करार केल्यानंतर आता ६० मशीन पालिकेत बसवण्यात आल्या असून त्यावर प्रत्येकाने हजेरी लावणं बंधनकारक असणार आहे.

Dubai: दुबईत जळगावातील ३१ नागरिक अडकले....

अमेरिका इराण युद्धात होणाऱ्या हल्ल्यामुळे दुबईत जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक अडकले....

विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी गेले जळगाव जिल्ह्यातील ३१ जण युद्धामुळे दुबईत अडकून पडले आहे.

हल्ल्यामुळे दुबई येथून विमानसेवा बंद झाल्यामुळे सर्व जण अडकले असून आहे त्या हॉटेलात सर्व जण सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे .

दोन दिवसापासून सततच्या होत असलेल्या हल्ल्यामुळे दुबईतील पर्यटन स्थळ तसेच सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे.

दुबई तसेच हॉटेल प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिला जात असून हॉटेलमध्ये थांबण्याचं सांगण्यात आल्याचे पर्यटकांनी सांगितले.

दुबईत अडकून पडलेल्या जळगावातील दुर्गेश चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली असून दुबईतील परिस्थिती कथन केली आहे

Nagpur: नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी नऊ जणांना अटक

नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी नऊ जणांना अटक

तर एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकासह 21 जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर सेफ्टी मॅनेजर यांच्यासह नऊ जणांना अटक

नागपूर ग्रामीण पोलिसांची एसबीएल कंपनी विरोधात मोठी कारवाई

स्फोटाच्या चौकशीसाठी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून दोन पथकांची निर्मिती

BNS सेक्शन 105 अंतर्गत कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह इतर संचालक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

या स्फोटात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय तर 26 जण जखमी झाले आहेत

खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

खासदार निलेश लंके यांच्या आपला मावळा या संघटनेच्या वतीने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जवळपास बाराशे कार्यकर्त्यांनी एकत्रित येत किल्ला परीसरात स्वच्छता मोहीम राबविली या मोहिमेत खासदार निलेश लंकेही सहभागी झाले होते. राज्यातील अनेक गड किल्ले यांची स्वच्छता आपला मावळा संघटना राबविते, सिंधुदुर्ग किल्ला येथे या बाराव्या मोहिमेचा शुभारंभ सिंधुदुर्ग किल्ल्यावर करण्यात आला. या मोहिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीला कळावे व विचारांची देवाण-घेवाण व्हावी; गड किल्ल्यांचे संरक्षण व्हावे असे मत खासदार निलेश लंके यांनी यावेळी व्यक्त केले

Pune: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पर्यटक देखील दुबईमध्ये अडकले

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पर्यटक देखील दुबईमध्ये अडकले

पिंपरी चिंचवड मधील 40 जण दुबईमध्ये अडकले

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक सुखरूप असल्याची प्रशासनाची माहिती

कौटुंबिक सहलीसाठी गेलेले नागरिक दुबईमध्ये अडकले

40 लोक दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये अडकले असल्याची माहिती

गेले दोन-तीन दिवस झाले ते रूममध्येच असल्याने अनेक जण घाबरले

भारत सरकारने तात्काळ पावले उचलून भारतात आणण्याची केली विनंती

सांगेली गावच्या ऐतिहासिक 'गिरोबा' उत्सवाला थाटात प्रारंभ

तळकोकणात मोठ्या उत्साहात शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगळीवेगळी व ऐतिहासिक परंपरा असलेल्या सांगेली गिरोबा होळी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. सुमारे ३५० वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असून ढोलताशांच्या गजरात व ''हर हर महादेव''च्या जयघोषात गिरोबा उत्सवाला प्रारंभ झाला.

राज्यस्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धेत अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्री किताबाचा मानकरी

सांगलीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकरने महाराष्ट्र श्री किताब पटकावला आहे.तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीने सांगलीमध्ये राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये राज्यातील जवळपास दीडशेहून अधिक शरीर सौष्ठव पट्टूनी सहभाग घेतला होता,या स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली होती.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आलं.या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांच्या देखील शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडल्या.

Nashik: नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीवरून नवा वाद

नाशिक महानगरपालिकातील प्रशासकीय राजवटीवरून नवा वाद

चार वर्षांच्या आर्थिक व्यवहारांवर श्वेतपत्रिकेची मागणी

शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांचे प्रशासनाला निवेदन

उत्पन्न, खर्च, कर्ज आणि विकासकामांचा सविस्तर खुलासा करा

सिंहस्थ कुंभमेळा खर्चाचाही अहवाल जाहीर करण्याची मागणी

२०२६-२७ अर्थसंकल्पापूर्वी सभागृहात माहिती देण्याचा आग्रह

पालिका प्रशासन काय भूमिका घेणार? याकडं लक्ष

अमेरिका इराण युद्धाचा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि कांदा निर्यातीला फटका

अमेरिका इराण युद्धाचा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि कांदा निर्यातीला फटका

रमजानच्या काळात आखाती देशांमध्ये भारतीय द्राक्ष आणि कांद्याला वाढती मागणी

मात्र अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे जलमार्ग बंद

होर्मुझ समुद्रधुनी जलमार्ग बंद झाल्याने निर्यातीला फटका

मागणी वाढूनही भारतीय निर्यातदार आणि शेतकऱ्यांना फायदा नाही

आखाती देशात शेतमालाचे भाव गगनाला भिडले

भारतातून द्राक्ष आणि कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम

Raigad: रायगडच्या कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह

होळीच्या सणानिमित्त रायगड जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. कोळीवाड्यांमध्ये अधिक उत्साह पहायला मिळतो आहे. अलिबागसह मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील कोळीवाड्यामध्ये रात्री होळी सजवण्यात आल्या. कोळी भगिनींनी होळीची मनोभावे पूजा केली. कोळी बांधव, भगिनींनी पारंपारिक वेशात सजून नटून पारंपरिक गाण्याच्या तालावर ठेका धरला.

Nashik: नाशिक महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर होणार सादर

नाशिक महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर होणार सादर

नाशिक महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीकडे केलं जाणार अंदाजपत्रक सादर

चार वर्षानंतर स्थायी समितीच्या सभापतींकडे केला जाणार अर्थसंकल्प सादर

निवडणूक न झाल्याने गेल्या चार वर्षापासून प्रशासनाकडेच होतात कारभार

3200 कोटींच्या अंदाजपत्रकात शहरातील पायाभूत विकास कामं आणि आगामी कुंभमेळ्यासाठी देखील विकास निधीची तरतूद असण्याची शक्यता

Yavatmal: प्रशासक होण्यापूर्वीच भंगले सरपंचाचे स्वप्न?, प्रशासकाच्या निर्णयाला स्थगिती

यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीची मुदत 28 फेब्रुवारी संपुष्टात आली या ग्रामपंचायतीवर सहा महिन्याकरिता सरपंचाची प्रशासक तर उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार होती,या संदर्भाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी काढले होते मात्र सरपंचाला प्रशासक म्हणून नेमता येणार नाही असे आदेश न्यायालयाने दिल्याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राला स्थगिती देण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे प्रशासक होण्यापूर्वी सरपंचाचे स्वप्न भंगल्याचे बोलल्या जात आहे.

एसबीएल स्फोटक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 18 कामगारांचा मृत्यू

एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 18 कामगाराचा मृत्यू.. तर 23 कामगार गंभीर जखमी

या कंपनीत सकाळच्या शिफ्टमध्ये 40 कामगार काम करत होते... येथे नरखेड तालुक्यातील विविध गावामधील कामगार आहेत कामाला..

स्फोट झाला तेथे कोणतेही सक्रिय उत्पादन सुरू नसल्याचा एसबीएल कंपनीचा दावा.. मात्र स्फोटाचे कारण अजून अस्पष्ट..

आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित..

बैठकीत एसबीएल कंपनीचे अधिकारी आणि मालकही उपस्थित राहण्याची शक्यता..

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित होणार बैठक

PESO (Petroleum and Explosives Safety Organization) चे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित राहतील.

सर्व मृतकांच्या वारसांनां आजच्या बैठकीत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय होणार..

Nagpur: नागपूरच्या नरसाळा येथील चाणक्यपूरममध्ये भीषण आग

नरसाळा येथील चाणक्यपूरममध्ये भीषण आग

पाण्याच्या टाकीखाली ठेवलेले १,७०० सिंथेटिक पाइप्सपैकी ७०० खाक,

अर्धा तास धुराचे लोट दिसताच परिसरात बघ्यांची गर्दी

मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्याला आग लागून घटना, कचऱ्याची आग सिंथेटिक पाइप्सपर्यंत पोहोचली

समाजविघातकांनी आग लावल्याची व्यक्त केलीं जात आहे शंका...पाइप्सवरील रबर आवरणामुळे धूर मोठ्या प्रमाणात

स्थानिक जितेंद्र मुळे यांनी अग्निशमन विभागाला दिली माहिती, १५-२० मिनिटांत फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी, पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण

शेजारील घरांपर्यंत आग पोहोचण्यापासून बचाव, नरसाळा परिसरात गटारलाइन कामासाठी पाइप्स साठवले होते,

मोकळ्या जागेतील कचऱ्यामुळे मोठी दुर्घटना टळली पण नुकसान मोठे

दुबईमध्ये अडकलेले सर्व पुणेकर सुरक्षित

जिल्हा प्रशासनाकडून सर्व लोकांशी संपर्क

इंदिरा महाविद्यालयाचे ८५ जणं यांच्यासह आणखी १० जणं दुबई मध्ये अडकल्याची माहिती

जिल्हा प्रशासनाकडून पुण्यातून दुबईला गेलेल्या प्रवाशांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू

आत्तापर्यंत पुण्यातून दुबईला गेलेल्या ९५ जणांशी संपर्क

दुबई मध्ये अडकलेल्या सर्व जणं सुरक्षित असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

संस्थेच्या झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सुनेत्रा पवार यांचे नाव अध्यक्षपदी निश्चित

बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव मांडला, त्यास उपस्थित सभासदांनी एकमताने अनुमोदन दिले

त्यानंतर उपाध्यक्ष यांनी पवार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविली

सुनेत्रा पवार यांनी हारतुरे न स्वीकारता साधेपणाने अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली

राज्यात सर्व कार्यालयांचे पॉश ऑडिट होणार

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

राज्यातील नोकरदार महिलांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी

राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी कारणांमध्ये पॉश ऑडिट, एका महिन्यात करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत

या संदर्भातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असून याबाबतचा अहवाल 30 दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्यास सांगण्यात आले

पुण्यातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष

अमेरिका इस्राएल - इराण मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस दक्ष

पुणे शहरातील धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी तसेच संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त

शिक्षण घेत असलेल्या अनेक इराणी विद्यार्थ्यांशी पुणे पोलिस संपर्कात

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून इराणी विद्यार्थ्यांशी संवाद

व्हिसाची मुदत संपत असल्यास इराणी विद्यार्थ्यांनी संपर्क साधल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिस प्रयत्न करणार

महिलांनीच दुकान थाटून सुरू केली दारू विक्री

गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी वारंवार यवतमाळच्या मारेगांव पोलिसांना निवेदन देऊनही अवैध दारू विक्री बंद होत नसल्याने बोटोणी येथील संतापलेल्या महिलांनी चक्क वणी- यवतमाळ मार्गावर देशी दारू दुकान थाटून आंदोलन केले. बोटणी गावात हातभट्टीचा महापूर असून अवैध दारू मुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झालीये.त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी अनोखा आंदोलन केलं.

रत्नागिरी- कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला

गावोगावी होम लावण्यास प्रारंभ

पौर्णिमेचे होम लागण्यास सुरुवात

रत्नागिरी तालुक्यातील भोके गावच्या देव सोमीया ग्रामदैवतेच्या शिमगोत्सवाचा लागला होम

ग्रामदेवतेच्या पालखी प्रदक्षिणेनंतर लागतो होम

गावात लागणाऱ्या होमासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी

ढोल ताशांच्या गजरात लागला होम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colombia Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT