maratha samaj rasta roko at manmad yeola road saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : मराठा आंदाेलकांचा रास्ता राेकाे, मनमाड-येवला मार्गावर वाहनांची 5 किलाेमीटर रांग

Maratha Reservation : मराठा आंदाेलक अधूनमधून मनाेज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत आहेत.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik News :

मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या आवाहनानुसार मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) मागणीसाठी मराठा समाजाने आज (साेमवाऱ) मनमाड-येवला मार्गावरील (manmad yeola road) रेल्वे उड्डाणपूलावर रास्ता रोको (rasta roko andolan) आंदाेलन केले आहे. या आंदाेलनामुळे मनमाड-येवला मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मार्गावर सुमारे 1 तास उलटूनही अद्याप रस्त्यावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या मार्गावर आंदाेलकांनी रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. जो पर्यंत तहसीलदार निवेदन घ्यायला येत नाही तो पर्यंत आंदाेलन सुरुच राहणार असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.  (Maharashtra News)

दरम्यान आंदोलकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या दोन्ही बाजूला 4 ते 5 किलाेमीटर पर्यंतच रांगा लागल्या आहेत. आंदाेलक अधूनमधून जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

Homemade Facepack : चाळिशीनंतरही चेहरा दिसेल तरुण; लावा 'हा' फेसपॅक, तुमच्याच सौंदर्याचे होईल कौतुक

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

Mumbai : मुंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT