maratha samaj decision to contest lok sabha election 2024 villagewise  Saam Digital
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : आमचंही ठरलं ! लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे राहणार, मानवतमध्ये मराठा समाजाचा निर्धार

Maratha Samaj : सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीत गावनिहाय काेण दाेन उमेदवार असणारी याची चर्चा सुरु झाली आहे.

Siddharth Latkar

Parbhani :

परभणी जिल्ह्यातील मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. आगामी काळात हाेणा-या लाेकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) गावनिहाय दोन उमेदवार देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. हा निर्णय मानवत येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज हा आक्रमक झालाय. आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक वर्षापासून लढा उभारला आहे. हा लढा मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकच तीव्र झालाय. (Maharashtra News)

सरकारने समाजाला न्याय देऊ, समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. परंतु त्याची पूर्तता केली नाही. यामुळे समाजाची दिशाभूल झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्यासाठी गावनिहाय किमान दोन उमेदवार देण्याचा निर्णय रविवारी परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आगामी काळातील लाेकसभा निवडणुकीत गावनिहाय काेण दाेन उमेदवार असणारी याची चर्चा सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT