Manoj Jarange Patil Kunbi Certificate Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation: मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडली, या जिल्ह्यात मोडी लिपीत आढळला पुरावा

Maratha Reservation Update: ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे.

Sandeep Gawade

Maratha Reservation

ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. मोडी लिपी संशोधन करणारे पथक शिरूर दौऱ्यावर होतं, त्यादरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते. नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गेले दोन महिने लढा देत आहेत. मराठा समाज कुणबी असून त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. त्यानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत. आजपर्यंत लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांचीही कुणबी नोंद सापडल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेवटचं सांगतो, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका

मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही, मात्र दिलेलं आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत नसेल तर हट्ट करून कसं चालेल ? असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना शेवटचं सांगतो, मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, अन्यथा तुमच्याकडे बघावं लागेल. असं म्हणत थेट अजित पवारांना इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात

मोदींच्या आवाहनानंतर VIP संस्कृतीला चाप, बचतीसाठी सरकारी कार्यक्रमांना कात्री

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT