Maratha Reservation Update Saam Digital
महाराष्ट्र

Maratha Reservation Update: जरांगेंना मुंबईत आंदोलनाची परवानगी देऊ नका; गुणरत्न सदावर्तेंचं पोलिसांना पत्र

Maratha Reservation Update News: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीला मुंबईत सभा घेणार आहेत. मात्र त्यांना 20 जानेवारीनंतर मुंबई आझाद मैदान. बीकेसी. शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देऊ नये, अशी तक्रार ॲड . गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Sandeep Gawade

Maratha Reservation Update

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीला मुंबईत सभा घेणार आहेत. मात्र त्यांना 20 जानेवारीनंतर मुंबई आझाद मैदान. बीकेसी. शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देऊ नये, अशी तक्रार ॲड . गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, गृह विभाग सेक्रेटरी यांच्याकडे तक्रार केली आहे. जरांगे यांच्या 20 तारीखच्या आंदोलनासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्क, बिकेसी कुठलंही मैदान देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.

जरांगे यांच्या आंदोलनावर सदावर्ते यांनी आरोप केले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी, पोलिसांवरील हल्ले, जाळपोळ, शासकीय मालमत्तांचे नुकसान आणि मुंबईतील व्यवसायिक आस्थापना सांकेतिक भाषेत बंद पाडू अशा विविध धमक्या देणाऱ्यांना परवानगी नाकारावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून लाखो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये धडकण्याचा इशारा सरकारला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर ट्रॅक्टर चालकांना आंदोलनात सहभागी न होण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या होत्या. लातूरमधूनही असाच प्रकार समोर आला असून मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT