Manoj Jarange Patil On Maratha Reservation Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'EWS हे नवीन पिल्लू आणलं...' सरकारच्या जाहिरातीवर जरांगे पाटील संतापले

Maratha Aarkshan News: मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध.. असा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Maratha Reservation:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज एकवटला असताना सरकारने EWS आरक्षणाची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध.. असा उल्लेख या जाहिरातीमध्ये करण्यात आला असून या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपत आल्याने ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे मराठा बांधव सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करत असतानाच सरकारकडूनEWS आरक्षणाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमधून मराठा समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोने करा, असे या जाहिरातीमध्ये म्हणले आहे. यावरुन आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जरांगे पाटलांची टीका..

दरम्यान, या जाहिरातीवरुन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारवर टीका केली आहे. "सरकारने EWSच्या जाहिरातीमधून नवीन पिल्लू बाहेर काढले आहे. मात्र आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको, कायमचा इलाज पाहिजे. आम्ही मागितलेले सरसकट आरक्षण द्या.." अशा शब्दात जरांगे पाटील यांनी या जाहिरातीवर टीका केली आहे.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी "तुमच्या हातात दोन दिवस आहेत. आरक्षणाचा निर्णय जाहीर करा. मराठ्यांच्या नादी लागू नका, त्यांच्याशी खेळू नका, असे म्हणत आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही गाफील नाही, 25 तारखेनंतर पेलणार नाही अशा आंदोलनाची घोषणा करणार आहोत," असा इशाराही सरकारला दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांच्या "बोध किर्तन" या पुस्तकाचे 31 ऑक्टोबरला प्रकाशन

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

SCROLL FOR NEXT