OBC Leader Babanrao Taywade Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: '54 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 99 टक्के जुन्या', ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा दावा

OBC Reservation: माझ्या मते, ज्या काही 54 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 99 टक्के जुन्याच नोंदी आहेत, असं ओबीसी महासंघाचे नेते डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले आहेत

साम टिव्ही ब्युरो

>> पराग ढोबळे

Babanrao Taywade On Maratha Reservation:

जरांगे म्हणतात 37 लाख लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केले आहेत. आणि त्यांच्याकडे यादी आहे. तर त्या यादीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. माझ्या मते, ज्या काही 54 लाख नोंदी सापडल्या त्यापैकी 99 टक्के जुन्याच नोंदी आहेत, असं ओबीसी महासंघाचे नेते डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत.

यातच आज जरांगे यांनी 54 लाख मराठा बांधवांच्या नोंदी मिळाल्यात, असं म्हणाले आहेत. याचबद्दल साम टीव्हीशी बोलताना बबनराव तायवाडे असं म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, जर 37 लाख लोकांना प्रमापत्र मिळाले असतील तर, आरक्षण मिळालेलं आहे. तर मग नोकर भरती स्थगित ठेऊन जागा रिक्त ठेवण्याच्या मागणीचे कारण काय? मग जागा कोणासाठी रिक्त ठेवायचे हे जरांगे यांनी स्पष्ट करायला पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

तायवाडे म्हणाले, सगेसोयरे संदर्भात निर्णय घेणे हे राज्य सरकारच्या हातात नाही. आपली पितृसत्ताक असल्याने वडिलांची जात मुलांना लागते, आईकडची जात लागत नाही.

ते पुढे म्हणाले, जे जीआर जरांगे मागत आहे, ते सर्व जुनेच नियम आहेत. 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहेच. त्या पुढच्या शिक्षणासाठी ही मदत मिळते. जरांगे यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रीभरात आंदोलन समाप्त होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT