Maratha Reservation Leader Manoj Jarange Patil Admitted In Chhatrapati Sambhajinagar's Galaxy Hospital Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Health: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Patil Health Update: अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर, ता. १७ मे २०२४

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशातच त्यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांना अचानक अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे ते तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दौरा अर्धवट सोडून जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले. डॉक्टरकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू आहे. सततचे दौरे आणि उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये तब्बल ९०० एकरात जाहीर सभा घेणार होते. ८ जून रोजी त्यांची ही सभा होणार होती. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषणाचीही घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेल नसल्याचे कारण देत अॅम्बुलन्स सेवा नाकारली गरोदर महिलेच्या पोटात नवजात बाळाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठ झाड कोसळले; 12 दुचाकी झाडाखाली अडकल्या

Online earning ideas: घरबसल्या पैसे कसे कमावू शकता?

Petrol- Diesel Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल-डिझेल ९ रुपयांनी महागणार? सर्वसामान्य नागरिक चिंतेत

Bhagyashree Mote Photos: सबसे कातील, भाग्यश्रीचे फोटो पाहून हेच म्हणाल

SCROLL FOR NEXT