Ashok Chavan on Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Ashok Chavan: सरकार आणि जरांगे यांच्या समन्वयातून मार्ग निघावा: अशोक चव्हाण

Ashok Chavan on Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यावर अनेक आरोप करत मुंबईकडे निघाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी, नांदेड

Ashok Chavan on Manoj Jarange Patil:

मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यावर अनेक आरोप करत मुंबईकडे निघाले आहेत. याबाबत भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हा प्रश्न समन्वयातून सोडवला गेला पाहिजे. सरकारने प्रयत्न केला, कायदाचा आधार घेउन सभागृहात कायदा पारित केला. पण आज जे चित्र निर्माण झाले ते काळजी करण्यासारखं असल्याचं, अशोक चव्हाण म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समन्वयातून मार्ग निघावा, अशी ईच्छा असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलण्याचं अशोक चव्हाण यांनी टाळलं. फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना देखील भाजपात आणल्याचं जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिलं नाही.  (Latest Marathi News)

दरम्यान, जरांगे यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''मनोज जरांगे हे जेव्हा अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करत होते. तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज आणि गोळीबार कोणी केला होता? याची चौकशी व्हायलाच हवी, अशी माझी मागणी आहे. आरक्षण द्यायचं होतं तर, मग गोळीबार आणि लाठीचार्ज का केला होता ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे. राज्यातील सर्व छोटी पक्ष संपवून टाका, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलं होतं. त्यावर आदित्य ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. बावनकुळे आणि यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे. चायनात जसा एकच पक्ष आहे, तसेच त्यांना आपल्या देशात देखील एकच पक्ष ठेवायचा आहे. चायना ज्या प्रकारची लोकशाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप आमदारासह 100 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Bridal Skin Care Tips: नवरीसाठी खास 5 स्किनकेअर टिप्स, लग्नात चेहऱ्यावर येईल चमक

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT