Maratha Aarakshan Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: एकच मिशन मराठा आरक्षण; ८५ वर्षांच्या आजोबांचं आमरण उपोषण सुरू

Maratha Reservation Hunger Strike: आपल्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आजोबा जिद्दिने उपोषणाला बसले आहेत.

Ruchika Jadhav

Maratha Aarakshan News:

मराठा समाजाला आरक्षण मिळवे यासाठी गावोगावी आंदोलकांनी साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज ६ वा दिवस असून आरक्षणासाठी एक ८५ वर्षीय वृद्ध आजोबा देखील उपोषण करतायत. आपल्या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे आजोबा जिद्दिने उपोषणाला बसले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात भैरवनाथ नरहरी भोसले आणि विष्णू अण्णा पवार हे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेत. विष्णू पवार यांचे वय ८५ वर्षे आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे तेव्हाच उपोषण सोडेल असा निर्धार आजोबांनी घेतलाय.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आजोबांना सलाईन लावण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी त्यास नकार दिला आहे. त्यामुळे विष्णू पवार या मराठा कार्यकर्त्यांची तब्येत देखील खालावत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात सर्वत्र मराठा बांधव आंदोलन करत आहेत. बऱ्याच ठिकाणी हे आंदोलन चिघळलं आहे. बसची तोडफोड, टायर जाळणे अशा पद्धतीने आंदोलन होताना दिसतंय.

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी आज मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यभरात मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदणीबाबत ही समिती आढावा घेत होती. बैठकिनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद होणार असून आतापर्यंतच्या समितीच्या कामकाजाची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, मोदींच्या हस्ते उद्घाटन; कुठून-कुठे असणार प्रवास

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

Palghar Fort : शौर्य अन् इतिहासाचा अनमोल वारसा, पालघरमध्ये वसलाय 'हा' भव्य किल्ला

Sleeping Problems: रोज ६ तासांपेक्षा कमी झोपता? शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Chanakya Niti : ऑफिसमध्ये जळणारे सहकारीही करतील कौतुक! चाणक्यांच्या या ७ नीती ठरतील यशाची गुरुकिल्ली

SCROLL FOR NEXT